ChatGPT : शिकारी खुद यहां शिकार हो गया! चॅट-जीपीटी विकसीत करणाऱ्या कंपनीला घरघर
ChatGPT : कृत्रिम बुद्धीमता, Artificial Intelligence ने सध्या धुमाकूळ घातला आहे. अनेकांना या नवीन तंत्रज्ञानामुळे नोकरी धोक्यात येईल असे वाटत आहे. त्यातील एकच ChatGPT हे तंत्रज्ञान विकसीत करणारी कंपनी सध्या अडचणीत सापडली आहे.
नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : ChatGPT हा आधुनिक युगाचा मंत्र आहे. या तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य लोकांना पण कृत्रिम बुद्धीमता (Artificial Intelligence) काय चमत्कार करु शकते, हे समजले. त्यासाठी त्यांच्याकडे विशेष तंत्रज्ञानाचे कोणते ही शिक्षण, कौशल्य असण्याची गरज नव्हती. ज्यांना संगणकाचे जुजबी ज्ञान आहे. त्यांना पण या तंत्रज्ञानाने अनेक कामे सहज करता यायला लागली. तर हे तंत्रज्ञान विकसीत करणारी कंपनी ‘ओपन-एआई’ (OpenAI) समोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ही कंपनी दिवाळखोर होण्याची दाट शक्यता आहे. चॅट-जीपीटी हे तंत्रज्ञान सुरु ठेवण्यासाठी जो खर्च लागतो, तो ही भागविण्याची क्षमता कंपनीत नसल्याचे समोर येत आहे. एका रिपोर्टमध्ये कंपनी कशी पेचात आहे, हे समोर आले आहे.
संकटाचे काळे ढग
चॅट-जीपीटी हे तंत्रज्ञान सॅम आल्टमॅन याने विकसीत केले. त्याचा स्टुडिओ ‘ओपन-एआई’ सध्या आर्थिक संकटांशी सामना करत आहे. त्याच्याकडे खर्च भागविण्याची पण ताकद उरली नाही. एनालिटिक्स इंडिया मासिकातील एका रिपोर्टनुसार, कंपनी 2024 पर्यंत दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे.
चॅट-जीपीटीचा रोजचा खर्च 5.80 कोटी रुपये
या रिपोर्टनुसार, चॅट-जीपीटी चे व्यवस्थापन करण्यासाठी रोजचा मोठा खर्च आहे. ‘ओपन-एआई’ ला त्यासाठी 7 लाख डॉलर म्हणजे रोजचे 5.80 कोटी रुपयांचा खर्च येतो. अर्थातच हा खर्च आवाढव्य आहे. सॅम आल्टमॅन यांच्या नेतृत्वाखालील ‘ओपन-एआई’ या कंपनीला चॅट-जीपीटाचा एकूणच खर्च भागवणे अवघड जात आहे. कंपनीचे आर्थिक स्त्रोत झपाट्याने घसरत आहे.
ऑपरेशनल कॉस्ट जास्त
ही कंपनी सातत्याने ‘जीपीटी 3.5’ आणि ‘जीपीटी-4’ टूलला मॉनेटाईज करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही या कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झालेली नाही. उलट महसूल कमी झाला आहे आणि ऑपरेशनल कॉस्ट जास्त आहे.
वापरकर्त्यांची संख्या रोडावली
प्रदार्पणात चॅट-जीपीटी ला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला या तंत्रज्ञानाचे युझर्स पण जास्त होते. पण नंतरच्या काळात वापरकर्त्यांची संख्या रोडावली. सिमिलरवेब डाटानुसार, जुलै 2023 मध्ये चॅट-जीपीटीच्या युझर्समध्ये जूनच्या तुलनेत 12 टक्के घसरण आली. तर जून महिन्यात ही संख्या 17 अब्ज इतकी होती. जुलै महिन्यात ती 15 अब्जावर आली आहे. त्यामुळे चॅटजीपीटीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या महसूलात मोठी घसरण झाली आहे. तसेच बाजारात स्पर्धा पण वाढली आहे.
एलॉन मस्कचे आव्हान
बाजारात सध्या अनेक ओपन सोर्स लँग्वेज मॉडल उपलब्ध आहेत. त्याचा चॅट-जीपीटी फटका बसत आहे. तर ओपनएआयला गूगल, मेटा-फेसबूकच नाही तर एलॉन मस्कचे पण आव्हान मिळत आहे. मस्क ‘TruthGPT’ लाँच करण्याच्या तयारीत आहेत.