Gold Silver Rate Today : सोन्यात पडझड कायम, खरेदीदार एकदम फायद्यात

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत पडझड कायम असून, खरेदीदार एकदम फायद्यात आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून भावात जोरदार घसरण सुरु आहे.

Gold Silver Rate Today : सोन्यात पडझड कायम, खरेदीदार एकदम फायद्यात
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 9:15 AM

नवी दिल्ली : अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर धोरणावरती आता सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Rate Today) मोठी तफावत दिसू शकते. पण सध्या सोने-चांदीतील पडझड कायम आहे. व्याजदर जर कमी झाले तर सोने-चांदीवरील डॉलरचा दबाव कमी होईल. हे दोन्ही मौल्यवान धातू एकदम उसळी घेतील. अमेरिकेतील महागाई दर सध्या 4 टक्क्यांवर आहे. त्यात वाढीची शक्यता कमी आहे. पण अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा निर्देशांक चढाच आहे. युरोपातील मोठ्या अर्थव्यवस्थांची पण अशीच अवस्था आहे. त्यामुळे सोने-चांदीत पडझडीचे सत्र कायम आहे. भारतीय गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना मोठा फायदा मिळत आहे.

मे नंतर जूनचा दिलासा सध्या सोने 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास घसरले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.

तरीही मागणीत घट सोने-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. तरीही बाजाराकडे ग्राहकांची पावले वळली नसल्याचा दावा आयबीजेएने केला आहे. भावात घसरण झाली असतानाही मागणीत त्या तुलनेत काहीच वाढ झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. केवळ 5-10 टक्केच मागणी वाढल्याने सराफा बाजार ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे.

हे सुद्धा वाचा

भावात घसरणीचा कल गुडरिटर्न्सनुसार, सोने-चांदीत पुन्हा घसरण होऊ शकते. गेल्या दोन दिवसांपासून भावात मोठा बदल झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी प्रति ग्रॅम 100 रुपयांची घसरण झाली होती. गेल्या पंधारवाड्यात 22 कॅरेट सोन्याचा निच्चांकी भाव 55,350 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,370 रुपयांपर्यंत खाली घसरले आहे. तज्ज्ञांच्या मते जुलै महिन्यात सोने उसळी घेऊ शकते. चांदी पंधरवाड्यात 73,400 रुपये किलोपर्यंत घसरली.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी 24 कॅरेट सोने 59856 रुपये, 23 कॅरेट 59616 रुपये, 22 कॅरेट सोने 54828 रुपये, 18 कॅरेट 44892 रुपये आणि 14 कॅरेट सोने 35016 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.