Bullet Train Stock : हा स्टॉक बुलेट ट्रेनपेक्षाही सूसाट! शेअर खरेदीसाठी उड्या, किंमत तर अवघी..

Bullet Train Stock : हा स्टॉक बुलेट ट्रेनपेक्षाही सूसाट धावणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. बुलेट ट्रेन स्टेशनच्या उभारणीचे काम या कंपनीला मिळाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी हा शेअर खरेदीसाठी भाऊगर्दी केली आहे.

Bullet Train Stock : हा स्टॉक बुलेट ट्रेनपेक्षाही सूसाट! शेअर खरेदीसाठी उड्या, किंमत तर अवघी..
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 5:41 PM

नवी दिल्ली : देशात मोदी सरकारने (Modi Government) गतीमान दळणवळण सुविधांसाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहे. रस्ते, रेल्वेचे जाळे अधिक गतिमान आणि मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधींचे प्रकल्प राबविले आहेत. इंग्रजकालीन रेल्वेसोबतच भारताने आता बुलेटचे स्वप्न पाहिले आहे. बुलेट ट्रेनचे (Bullet Train) स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शासकीय पातळीवर अडथळ्यांची शर्यत दूर करण्यात आली आहे. बुलेट ट्रेन स्टेशन उभारणीचे काम एका कंपनीला देण्यात आले. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. बुलेट ट्रेन स्टेशनच्या (Bullet Train Station) उभारणीचे काम या कंपनीला मिळाले आहे. शेअर बाजारात हा स्टॉक (Stock) बुलेट ट्रेनपेक्षाही सूसाट धावणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला (Hindustan Construction Company Limited) आणि बांधकाम सेवा क्षेत्रातील मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MIEL) या दोन कंपन्यांना संयुक्तपणे बुलेट ट्रेन स्टेशन निर्मितीचा प्रकल्प मिळाला आहे. हा प्रकल्प 3,681 कोटी रुपयांचा आहे. मंगळवारी याविषयीची माहिती देण्यात आली. हे वृत्त बाहेर पडताच, कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड उलाढाल झाली. शेअरची मागणी प्रचंड वाढली.

या कंपनीच्या शेअरमध्ये 5.92 टक्के तेजी आली. या वृद्धीने कंपनीचा शेअर 15.20 रुपयांवर पोहचला. शेअर बाजारात हिंदुस्तान कंस्ट्रक्शन लिमिटेडचा शेअरने 22.70 रुपये हा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. तर 10.55 रुपये प्रति शेअर हा या कंपनीचा 52 आठवड्यांचा नीच्चांक होता. आता एवढे मोठे कंत्राट मिळाले म्हटल्यावर कंपनीचा स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत या कंपनीचा महसूल घटला होता. या कंपनीचा खर्च, कमाई पेक्षा अधिक होता. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने बचतीसह कमाईपण केली होती.

हे सुद्धा वाचा

नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) 508.17 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबई ते अहमदाबाद असा हा बुलेट ट्रेन मार्ग असेल. वांद्रे कुर्ला, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन उभारणीचे काम कंपनीला देण्यात आले आहे.

हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेडने याप्रकल्पाविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बुलेट ट्रेन स्टेशन हा सहा प्लॅटफॉर्मचा असेल. प्रत्येक प्लॅटफॉर्म हा 414 मीटरचा असेल. 16 कोचसाठीच्या बुलेट ट्रेनसाठी हे स्टेशन उपयुक्त असेल. वांद्रे कुर्ला स्टेशन हे भूमिगत स्टेशन आहे. जमिनीपासून हे स्टेशन 24 मीटर खोल तयार करण्यात येणार आहे. हे स्टेशन एकूण तीन मजली असेल.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.