Government Company : केंद्र सरकारला वाटतंय ओझं, कंपनीने तर करुन दाखवलं, कमावला तगडा नफा!
Government Company : या सरकारी कंपनीने केंद्र सरकारला कृतीतून उत्तर दिले. कमाईत या कंपनीने जोरदार मुसंडी मारली. ही कंपनी विक्री करण्याची तयारी सुरु आहे.
नवी दिल्ली : भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कंपनीने मोठी कामगिरी फत्ते केली. मार्चच्या तिमाहीत कंपनीने जोरदार प्रदर्शन केले. कंपनीने कमाईत नवीन उच्चांक गाठला. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत या कंपनीने केंद्र सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी कामगिरी बजावली. या कंपनीच्या नफ्यात (Quarter Profit) 158.99 टक्के वाढ होऊन हा आकडा 6,477.74 कोटी रुपयांवर पोहचला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत याच तिमाहीत बीपीसीएल कंपनीला 2501.08 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. डिसेंबरच्या तिमाहीत या कंपनीने 1,959.58 कोटी रुपयांचा नफा झाला.
इतका वाढला महसूल मार्च महिन्याच्या तिमाहीत बीपीसीएलचा महसूल पण वधारला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 8.3 टक्क्यांनी वाढून 1,33,413.81 रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षांत याच तिमाहीत कंपनीचा महसूल 1,23,382 कोटी रुपये होता. तिमाहीच्या आधारावर कंपनीला इतका फायदा झाला नाही.
एकत्रित नफा किती मार्च महिन्याच्या तिमाहीत बीपीसीएल कंपनीच्या खर्चात मोठी वाढ झाली. हा खर्च 1,24,668.36 रुपयांवर पोहचला. एकत्रितपणे या कंपनीचा नफा 6,870.47 कोटी रुपये झाला. हा आकडा एक वर्षांपूर्वी याच तिमाहीत 2,559.17 कोटी रुपये होता. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात BPCL ची बाजारातील विक्री गेल्यावर्षीच्या तुलनेत 42.51 एमएमटीच्या तुलनेत 48.92 एमएमटी राहिली. एटीएफ 65.64 टक्के, एचएसडी-रिटेल 25.36 टक्के आणि एमएस-रिटेल 18.01 टक्के अशी विक्री झाली.
लाभांश वाटणार बीपीसीएलच्या बोर्डाने त्यांच्या शेअर होल्डर्ससाठी लाभांश वाटपाची घोषणा केली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाने प्रत्येक 10 रुपयांच्या फेसव्हॅल्यूवर 4 रुपयांचा लाभांश मिळेल. अजून या निर्णयावर वार्षिक सर्वसाधारण सभेत मोहर लागणे बाकी आहे. बीपीसीएलचे शेअर सोमवारी NSE वर 0.50 टक्के तेजीसह 362.10 रुपयांच्या भावावर बंद झाले.
गेल्या एक महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये चार टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या एका वर्षात या स्टॉकला किंमतीत 9 टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला. वर्ष 2000 पासून बीपीसीएलने शेअरधारकांना आतापर्यंत चार वेळा बोनस जाहीर केला आहे.
सरकारी बँका पण फायद्यात गेल्या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा 59 टक्क्यांनी वाढून 50,232 कोटी रुपये झाला. तर सर्वांना चकित करत बँक ऑफ महाराष्ट्राने मोठी झेप घेतली. ही बँक जोरदार फायद्यात आली. महाबँकेने 126 टक्क्यांचा नफा कमविला. या बँकेने 2,602 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर युको बँकेचा क्रमांक आहे. या बँकेने 100 टक्के नफा कमवित 1,862 कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोद्याने 94 टक्के तेजीसह 14,110 कोटी रुपयांचा नफा मिळविला.