“कळतच नाही माझा मुलगा असा का आहे”, गौतम सिंघानियाविरोधात वडिलांनी ठोकले शड्डू

Gautam Singhania | रेमंड उद्योगसमूहाच्या संचालकाचे कौटुंबिक वाद अजून संपलेले नाहीत. गेल्या 10 दिवसांत उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. पण नात्यातील वीण किती तकलादू आहे. मुलाचे वडिलांशी पटत नाही. पतीचे-पत्नी जुळत नाही, असे प्रकार त्यांनी जगजाहीर भूमिका घेतल्याने समोर आले आहे. आता सासऱ्याने या सर्व वादात सुनेची साथ देण्याची भूमिका घेतली आहे. या वादाला अनेक पदर असल्याचे समोर येत आहे.

कळतच नाही माझा मुलगा असा का आहे, गौतम सिंघानियाविरोधात वडिलांनी ठोकले शड्डू
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 6:12 PM

नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : रेमंड हा मोठा उद्योग समूह आहे. कपडे आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचा विस्तार आहे. समूहाचे संचालक गौतम सिघांनिया यांनी त्यांचे खासगी आयुष्य आणि त्यातील वाद ऐन दिवाळीत जगजाहीर केले. पती-पत्नीत अलबेल नसल्याचा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर दोघांच्या नात्याची चिरफाड केली. पत्नीशी काडीमोड घेण्याची भूमिका घेतली. तर पत्नीने पतीवर मारहाणीचा दावा केला. त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांनी प्रतिवार केला. रेमंड समूहाच्या दिवाळीच्या पार्टीत आमंत्रण देण्यात आले, पण त्यांना प्रवेश देण्यात आला नाही असा आरोप त्यांनी एका व्हिडिओत केला. आता या वादात विजयपत सिंघानिया यांनी उडी घेतली आहे. त्यांना संपत्तीतून बेदल केल्याचे प्रकरण गाजले होते. मुलावर ते नाराज आहेत. ते सुनेची साथ देणार आहेत.

मी खूप मोठी चूक केली

विजयपत सिंघानिया यांनी गौतम सिंघानिया यांना सर्व संपत्ती सोपविल्याचे दुःख होत आहे. ही आपली घोडचूक असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. आपल्या मुलाने आपल्याला घरातून हाकलून दिल्याचे आणि सध्या किरायाच्या घरात आश्रय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता मुलगा सुनेबाबत पण तीच भूमिका घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

कळतच नाही हा मुलगा असा का आहे?

बिझनेस टुडेला त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मुलावर गंभीर आरोप केले. मी त्याला संपत्ती सोपवली आणि त्याने माझी ज्यावर गुजारण होत होती, ते सर्व माझ्याकडून हिसकावून घेतले, अशी आपबित्ती त्यांनी कथन केली. ‘माझ्या मुलाने या संपत्तीतील काही वाटा मला देण्याचे कबुल केले आणि नंतर तो या आश्वासनावर टिकला नाही. मी तर त्याला सर्व काही दिले. आता माझ्याकडे फारच कमी शिल्लक उरली आहे. त्यातूनच उर्वरीत आयुष्य घालवत आहे. मी सध्या भाड्याच्या घरात राहतो. आता तो पत्नीशी पण तसेच वागत आहे, कळतच नाही हा मुलगा असा कसा आहे?’ त्यांच्या या वक्तव्याने अनेकांना विचार करायला लावला आहे.

मुलांना ताट द्यावे, बसण्याचा पाट देऊ नये

मुलांना ताट द्यावे, पण बसण्याचा पाट देऊ नये, अशी एक जुनी म्हण विजयपत सिंघानिया यांच्या अनुभवावरुन अनेकांना आठवल्याशिवाय राहणार नाही. मुलांना सर्वकाही देण्याची घाई करु नका, असा सल्ला त्यांनी दिला. मृत्यूनंतर संपत्ती त्यांना सोपविण्याची तजवीज करण्याचे आवाहन त्यांनी केले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व काही मुलांच्याच नावे होते, असे ते म्हणाले.

सुनेच्या पाठीशी

आपण सुनेच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. नवाज मोदी सिंघानिया याप्रकरणात काही विचारविनिमय करण्यासाठी येत असेल तर आपण तिच्याशी पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गौतम सिंघानिया कधीच संपत्तीतील 75 टक्के वाटा नवाज मोदीच्या नावावर करणार नाही, असा दावा त्यांनी केला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.