शेअर बाजारात घसरणीचं चक्र थांबेना, गुंतवणुकदारांत अस्थिरता; सेन्सेक्स 153 अंकांनी डाउन

सेन्सेक्स मध्ये 153 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 52694 अंकांच्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी 42 अंकांच्या घसरणीसह 15732 च्या स्तरावर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 15 शेअर्स घसरणीसह तर 15 शेअर वधारणीसह बंद झाले.

शेअर बाजारात घसरणीचं चक्र थांबेना, गुंतवणुकदारांत अस्थिरता; सेन्सेक्स 153 अंकांनी डाउन
बाजारात घसरणीचे सत्र थांबेना Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 7:53 PM

नवी दिल्लीः जागतिक अर्थपटलावरील घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात (Share Market) विक्रीचं सत्र राहिलं. त्यामुळे आज शेअर बाजारात तेजी-घसरणीचं चित्र दिसून आलं. आजच्या व्यवहाराच्या अखेर सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स मध्ये 150 अधिक अंकांची घसरण झाली. तर निफ्टी 15750 च्या टप्प्यांवर बंद झाला. आजच्या व्यवहारदरम्यान बँक, फायनान्शियल्स आणि ऑटो तिन्ही क्षेत्रांत (Sector)विक्री नोंदविली गेली. निफ्टी वर तिन्ही निर्देशांकात (Sensex) घसरण नोंदविली गेली. आयटी, फार्मा, मेटल आणि रियल्टी निर्देशांकात तेजी राहिली. सेन्सेक्स मध्ये 153 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 52694 अंकांच्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी 42 अंकांच्या घसरणीसह 15732 च्या स्तरावर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 15 शेअर्स घसरणीसह तर 15 शेअर वधारणीसह बंद झाले. आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये NTPC, BHARTIARTL, M&M समाविष्ट आहे. तर घसरणीच्या शेअर्समध्ये INDUSINDBK, TECHM, RELIANCE आणि MARUTI यांचा समावेश होतो.

एलआयसीच्या घसरणीला ब्रेक

एलआयसी शेअर्समधील सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज एलआयसी शेअर घसरणीसह 684 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. गेल्या आठवड्यात शेअर 668 रुपयांवर पोहोचला होता. एलआयसीचा शेअर आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर पोहचला होता. शेअर 700 रुपयांच्या खाली घसरला. एलआयसीने 668 रुपयांचा नीचांकी दर गाठला होता.   17 मे 2022 रोजी एलआयसीचा शेअर बाजारात सुचीबद्ध झाला होता. तेव्हापासूनच्या घसरणीचा विचार करता आतापर्यंत हा शेअर 21.31 टक्क्यांनी घसरला आहे.एलआयसी शेअर्स आपली इश्यू प्राईस 949 रुपयांच्या तुलनेत 25 टक्क्यांहून अधिक डिस्काउंट सह ट्रेडिंग करीत आहे.एलआयसी शेअरहोल्डर्सला आतापर्यंत 1.5 लाख कोटींचा फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा

शेअर बाजारात रिकव्हरी

शेयर बाजारात रिकव्हरीचं चित्र दिसून आलं. सेन्सेक्स 150 हून अधिक अंकासह बळकट झाला. निफ्टी 61 अंकांच्या वाढीसह 15835 च्या स्तरावर ट्रेडिंग करीत आहे. बँक, फायनान्शियल आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी नोंदविली गेली.

गृहकर्ज महागलं, बांधकाम क्षेत्राला धास्ती?

वाढत्या महागाईला ब्रेक लावण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक तिमाही पतधोरणाची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात 50 बेसिस अंकांनी वाढ करण्याच्या निर्णय घेतला आहे. रेपो दरात 50 बेसिस अंकांनी वाढ केल्यानंतर सुधारित रेपो दर 4.4 टक्क्यांवरुन 4.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर वाढीमुळं सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्ज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएलआर मध्ये वाढ केल्यामुळे वैयक्तिक, व्यावसायिक, वाहन, गृह सर्वप्रकारचे कर्ज महागणार आहेत.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.