Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Interest Rate : ठेवीवर 85.98% व्याज! या देशात ठेवीदाराला मिळते घबाड, जगभरात कुठे मिळते अधिक व्याज

Bank Interest Rate : या देशात बँकेतील ठेवीवर जोरदार व्याज मिळते. ठेवीदार काहीच महिन्यात मालमाल होतो. तर काही देशात बँका ठेवीवर छदाम पण देत नाहीत. जगातील या देशात किती मिळते व्याज, जाणून घ्या..

Bank Interest Rate : ठेवीवर 85.98% व्याज! या देशात ठेवीदाराला मिळते घबाड, जगभरात कुठे मिळते अधिक व्याज
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 8:54 PM

नवी दिल्ली : भारतात बँकेच्या मुदत ठेवीवर (Fixed Deposits-FD) आजच्या घडीला सरासरी 7% पर्यंत व्याज देण्यात येते. पण जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत, जिथे व्याजदर भूतो न भविष्यती इतका आहे. आपल्या कल्पने पलिकडे या देशात एफडीवर व्याज देण्यात येते. हे व्याजदर भारतीय बँका देत असलेल्या व्याजदरापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. तर काही देशातील बँका ठेवीदारांना व्याज दरात (Interest Rate) एक छदाम पण परतावा देत नाहीत. जगातील काही देशांत ठेवीवर किती व्याज मिळते ते समजून घेऊयात

व्याजदराचा लेखाजोखा वर्ल्ड ऑफ स्टॅटेटिक्सने (World of Statistics) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर याविषयीची माहिती शेअर केली आहे. जगभरातील बँका त्यांच्या देशातील ठेवीदारांना मुदत ठेवीवर, एफडीवर किती व्याज देतात, याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. याविषयीची एक यादीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वाधिक व्याज इथे त्यानुसार सर्वाधिक व्याजदर अर्जेंटिनामधील ठेवीदाराला मिळतो. हा देश या यादीत प्रथम आहे. या देशात ठेवीदाराला 85.98 टक्के व्याज मिळते. दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच व्हेनेझुएला हा देश आहे. या देशात एफडीतील बचत फायदेशीर ठरते. या देशात मुदत ठेवीवर 36 टक्के व्याज मिळते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर, सध्या रशियासोबत युद्ध करणारा पिटुकला युक्रेन हा देश आहे. या देशात व्याजदर 13.23 टक्के इतका होता.

पाकिस्तान भारतापेक्षा पुढे या यादीत चौथ्या क्रमांकावर हंगेरी हा देश आहे. हंगेरीत मुदत ठेवीवर 12.5 टक्के व्याज मिळते. 5 व्या क्रमांकावर इजिप्त हा देश आहे. येथे ठेवीदारांना 10.8 टक्के व्याज मिळते. 6 व्या क्रमांकावर ब्राझिल हा देश आहे. या देशातील ठेवीदाराला 10.31 टक्के व्याज मिळते. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानचा क्रमांक या यादीत 7 आहे. पाकिस्तानमध्ये ठेवीदारांना 7.25 टक्के व्याज मिळते. तर तुर्की आणि भारतात सध्या 7 टक्के व्याज देण्यात येते.

केंद्रीय बँकेकडून इतकी कमाई यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये केंद्रीय बँकेने केंद्र सरकारला 30,307 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. केंद्र सरकारला आरबीआयकडून सर्वाधिक लाभांश मिळाला आहे. केंद्राला 2018-19 या आर्थिक वर्षात सर्वाधिक लाभांश मिळाला. या वर्षी 1.75 लाख कोटी रुपये तिजोरीत आले होते. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 99,122 कोटी रुपये, 2019-20 मध्ये 57,127 कोटी रुपये, 2017-18 आर्थिक वर्षात 50 हजार कोटी रुपये मिळाले होते.

250 बेसिस पॉईंटची वाढ भारतीय केंद्रीय बँकेने आतापर्यंत रेपो रेट दरात सहा वेळा वाढ केली आहे. ज्या दरावर इतर बँकांना आरबीआय उधार कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हणतात. मे 2022 पासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये 250 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षातील ही पहिली तर या वर्षातील दुसरी वाढ ठरेल. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने यापूर्वी रेपो दर 25 बीपीएसने वाढवला होता.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.