Core Industries Double Digits | प्रमुख उद्योगांची मुसंडी! आठ उद्योगात दोन आकडी वृद्धीची नोंद, 12.7 टक्क्यांची दरवाढ

Core Industries Double Digits | औद्योगिक क्षेत्राच्या जोरावर पुन्हा एकदा दोन अंकी वृद्धी नोंदवण्यात आली आहे. वीज, कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि खते या आठ प्रमुख उद्योगांमध्ये भारताने दोन आकडी वृद्धी नोंदवली आहे.

Core Industries Double Digits | प्रमुख उद्योगांची मुसंडी! आठ उद्योगात दोन आकडी वृद्धीची नोंद, 12.7 टक्क्यांची दरवाढ
प्रमुख उद्योगात चांगली आघाडीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 7:00 AM

Core Industries Double Digits |  भारताच्या मुख्य क्षेत्रातील उत्पादनाने (Core Industries) जूनमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात 12.7% वर दुहेरी अंकी वाढ (Double Digits Growth) नोंदवली. परंतू, मे महिन्याचा विचार करता हा आकडा तसा कमी आहे. मे महिन्यात हा वृद्धी दर 19.3% होता. पण त्यानंतर जून आणि जुलैमध्ये आकड्यांमध्ये घसरण झाली असली तरी या घसरणीला ब्रेक लागला असून दोन आकडी वृद्धी दर या उद्योगांमुळे कायम ठेवण्यात यश आले आहे. शुक्रवारी सरकारने याविषयीची आकडेवारी जाहीर केली. आठ प्रमुख उद्योगांमध्ये (Eight Main Industries) वीज, कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि खते यांचा समावेश होतो. कोळसा, पेट्रोलियम, सिमेंट आणि वीज क्षेत्रात दोन अंकात वाढ झाली आहे. जून 2022मध्ये कोळशाच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 31.1% वाढ झाली. जून 2022 मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन वार्षिक आधारावर 1.7% कमी झाले. तिमाहीनुसार (quarter), या उद्योग क्षेत्राची वाढ एप्रिल-जूनमध्ये केवळ 13.7% आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. मागील वर्षी याच तिमाहीत 26% वृद्धी नोंदवण्यात आली होती.

तज्ज्ञांचे मत काय?

ICRA च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी या वृद्धीबाबत मत नोंदवले आहे. ही वृद्धी अपेक्षेवर उतरल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य उद्योग क्षेत्राने जून 2022 मध्ये 12.7% वृद्धी नोंदवल्याचे त्यांनी सांगितले. मे महिन्यांत वृद्धी दर 19.3% होता. ICRA ने हा वृद्धी दर 11-12% असेल असा अंदाज व्यक्त केला होता. कोळसा, सिमेंट, रिफायनरी उत्पादने आणि वीज निर्मितीने जून 2022 मध्ये दुहेरी अंकी वाढ दर्शविली, तर स्टील आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रातील वाढ निःशब्द करणारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र IIPमधील वाढ 11-13% कमी येण्याची भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT)शुक्रवारी जून 2022 महिन्यासाठी आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक (ICI) जारी केला. या माध्यमातून आठ प्रमुख उद्योगांमध्ये उत्पादनाची एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरी जोखल्या जाते. त्यांची प्रगती तपासली जाते. यामध्ये कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज यांचा समावेश आहे. मार्च 2022 साठी आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा अंतिम वाढीच्या दरात सुधारणा दिसून आली होती. तो 4.3 टक्क्यांवरून 4.8 टक्क्यांवर पोहचला होता. एप्रिल-जून 2022-23 दरम्यान ICI चा वाढीचा दर मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.7 टक्के होता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.