टाटाचा अजून एक रेकॉर्ड; छापले 20 हजार कोटी, या कंपन्या पण मागे नाहीत
Tata TCS | देशातील टॉप 10 कंपन्यांमधील 7 कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 65300 कोटी रुपयांनी वाढले. या कंपन्यांचे भांडवल एकदम वाढले आहे. सर्वाधिक फायदा टाटा समूहातील टीसीएस कंपनीला झाला. तर इतर तीन कंपन्यांचे मार्केट कॅम्प पण जोरदार वाढले. या यादीत रिलायन्स कितव्या क्रमांकावर?
नवी दिल्ली | 3 March 2024 : रतन टाटा यांच्या कंपन्या शेअर बाजारात धुमाकूळ घालत आहेत. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे केले आहे. या समूहातील कंपन्यांचे मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक टीसीएसचे मार्केट कॅप सर्वाधिक वाढले आहे. टीसीएसचे बाजारातील भांडवल 15 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. सलग पाच दिवसांत या शेअरने मोठी उसळी घेतली. त्यानंतर त्यात थोडी घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसात टीसीएसच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून येईल. तर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजाला फार मोठा फटका बसला आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला पण नुकसान सहन करावे लागेल आहे.
कोणत्या कंपन्यांचा वाढला नफा, कोणाचे झाले नुकसान
- या आठवड्यात TCS चे मार्केट कॅप 19,881.39 कोटी रुपयांनी वाढले. तर एकूण बाजारातील भांडवल वाढून ते 14,85,912.36 कोटी रुपये झाले.
- ICICI Bank ने आठवड्यात 15,672.82 कोटी रुपये जोडले. बँकेचे मार्केट कॅप आता 7,60,481.54 कोटी रुपयांवर पोहचले.
- सार्वजनिक उपक्रमातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला या आठवड्यात 12,182.1 कोटी रुपयांचा फायदा झाला. एसबीआयचे एकूण मार्केट कॅप 6,89,917.13 कोटी रुपये झाले.
- देशातील सर्वात मोठी खासगी बँक, HDFC Bank चे मार्केट कॅप 7,178.03 कोटी रुपयांनी वाढले. सध्या या बँकेचे एकूण मार्केट कॅप 10,86,464.53 कोटी रुपये आहे.
- देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्यांकन 5,051.63 कोटी रुपयांहून वाढून आता 5,67,626.01 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
- सुनील भारती मित्तल यांची टेलिकॉम कंपनी भारती Airtel चे मूल्य 4,525.14 कोटी रुपयांनी वाढले. आता एअरटेलचे बाजारातील भांडवल 6,38,721.77 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
- या पाच दिवसांत ITC ची बाजारातील पत 811.39 कोटी रुपयांनी वाढून 5,14,451.76 कोटी रुपयांवर पोहचली आहे.
- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चे मार्केट कॅप 19,892.12 कोटी रुपयांनी घसरले. आता एलआयसीचे मार्केट कॅप 6,54,763.76 कोटी रुपयांपर्यंत खाली उतरले.
- देशातील सर्वात मोठी आयटी कंपन्यांपैकी एक Infosys चे मार्केट कॅप 9,048.17 कोटी रुपयांनी घटले. कंपनीचे मार्केट कॅप 6,86,997.15 कोटी रुपयांवर आले.
- Reliance Industries ची बाजारातील पत 3,720.44 कोटी रुपयांनी घसरली. मार्केट कॅप घसरून 20,16,750.44 कोटी रुपये उरले आहेत.
हे सुद्धा वाचा