Tax On Gold : डिजिटल असो वा फिजिकल, सोन्यावर इतक्या करांचा बोजा

Tax On Gold : सोन्यावर अनेक प्रकारचे कर आकारल्या जातात. तुम्ही डिजिटल अथवा फिजिकल कोणत्याही प्रकारचे सोने खरेदी केले तरी तुम्हाला सोन्यावर करा भरावा लागतो. कोणत्या प्रकारचे कर तुम्हाला भरावे लागतात, ते पाहुयात

Tax On Gold : डिजिटल असो वा फिजिकल, सोन्यावर इतक्या करांचा बोजा
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 9:20 PM

नवी दिल्ली : डिजिटल सोन्यात (Digital Gold) गेल्या काही वर्षात जास्त गुंतवणूक सुरु आहे. सराफा बाजारातही सोने खरेदी केले तर त्यावर अनेक प्रकारचे शुल्क मोजावे लागते. पण आजही अनेक गुंतवणूकदारांना डिजिटल गोल्डवर (Tax On Digital Gold) कर लागतो, हे कळत नाही. फिजिकल गोल्ड सारखेच डिजिटल गोल्डवरही अनेक कर द्यावे लागतात. सोने कोणत्याही प्रकारचे असो, त्यावर कर द्यावा लागतो. भूतानने भारतीयांसाठी सोने खरेदीची खास ऑफर आणली आहे. भारतीयांना प्युअर सोनं 26 हजारांनं स्वस्त मिळणार आहे. सध्या भारतात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपये सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करायचं असेल तर भूतानमध्ये जावे लागेल. विशेष म्हणजे भारतीयांसाठी इथं व्हिसाचीही गरज नाही.

डिजिटल वॉल्टमध्ये डिजिटल गोल्ड तीन वर्षांच्या आत विक्री केले तर तुम्हाला झालेल्या नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो. हा कॅपिटल गेन सोन्यातील तुमच्या एकूण गुंतवणुकीवर अवलंबून असतो. टॅक्स स्लॅबनुसार कर द्यावा लागतो. 3 वर्षांनंतरची विक्री दीर्घकालीन भांडवली नफा गृहीत धरली जाते. इंडेक्सेशन लाभानंतर यावर 20 टक्के कर आकारण्यात येतो.

डिजिटली गोल्ड खरेदीवर 3 टक्के जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे गुगल पे (Google Pay), पेटीएम (Paytm) आमि फोनपे (PhonePe) या माध्यमातून जितक्यावेळी तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी कराल, त्यावर जीएसटी आकारण्यात येईल. डिजिटल गोल्ड फिजिकल गोल्डमध्ये हस्तांतरीत केल्यास त्यावर मेकिंग चार्ज आणि डिलिव्हरी शुल्क द्यावे लागेल. डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्ड याशिवाय गुंतवणुकीचा अजून एक प्रकार आहे. त्याला पेपर गोल्ड असे म्हणतात. सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB) वगळता गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्यअल फंडचे युनिट रिडीम करताना फिजिकल गोल्डप्रमाणेच कर लागतो.

हे सुद्धा वाचा

सॉव्हरेन गोल्ड बाँड प्रकरणात करासंबंधीचे नियम वेगळे आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्पन्नावर स्लॅबनुसार या कमाईवर कर भरावा लागतो. गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षे आहे. मॅच्युरिटीपर्यंत जर तुम्ही सोने विक्री केले नाही तर त्यावर कॅपिटल गेन कर लागत नाही.

सार्वभौम सुवर्णरोखे योजनेतंर्गत 6 ते 10 मार्च या काळात स्वस्त सोने खरेदीची संधी मिळेल. सोमवारपासून जनतेला या योजनेत गुंतवणूक करता येईल. सोन्याचा भाव 5,611 रुपये प्रति ग्रॅम आहे. सेंट्रल बँकेने एक अधिकृत निवेदन दिले आहे. त्यानुसार, ऑनलाईन अथवा डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसमध्ये 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना गोल्ड बाँडची इश्यू प्राईस एका ग्रॅमसाठी 5,561 रुपये असेल. गोल्ड बाँड लवकर मोडले तर त्यावर 20 टक्के कर लागेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.