Gold Silver Rate Today : सोने आले स्वस्ताई घेऊन, चांदीने फुंकला महागाईचा बिगुल, आजचा भाव घ्या जाणून

Gold Silver Rate Today : सोन्यात घसरण दिसून आली तर चांदीने महागाईचा बिगुल फुंकला आहे. रविवारी सराफा बाजारात फेरफटका मारण्यापूर्वी किंमतीत किती बदल झाला हे घ्या जाणून. 

Gold Silver Rate Today : सोने आले स्वस्ताई घेऊन, चांदीने फुंकला महागाईचा बिगुल, आजचा भाव घ्या जाणून
जाणून घ्या भाव
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 9:13 AM

नवी दिल्ली : देशात गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Rate Today) सातत्याने चढउतार दिसत आहे. मे महिन्यापासून दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. भाव वाढीचा नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. मे महिन्याचाच कित्ता जून महिन्यातही गिरवला जात आहे. सोने-चांदीच्या आघाडीवर मोठा धमाका अद्याप झालेला नाही. या आठवड्यात सोने-चांदीत दोन दिवस सोडले तर आपटी बारच दिसून आला. या आठवड्यात सोने हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. तर चांदी 1257 रुपये प्रति किलोने महागली. सोने तर 60,000 रुपयांच्या पण खाली आले आहे. तर चांदीची घसरगुंडी उडाली असून ती 73000 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

पंधरवाड्यात असा झाला बदल

  1. goodreturns नुसार, 1 जून रोजी सोन्यात 150 रुपयांची घसरण झाली होती.
  2. 22 कॅरेट सोने 55,850 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेटचा भाव 60,930 रुपये पोहचला.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 2 जून रोजी सोन्याने मुसंडी मारली. सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारले
  5. 3 जून रोजी सोन्यात मोठी पडझड झाली. सोने 700 रुपयांनी आपटले
  6. 4, 5 जून रोजी भावात मोठा बदल झाला नाही
  7. 6 जून रोजी भावात प्रति 10 ग्रॅम 300 दरवाढ झाली
  8. 7 जून रोजी भावात मोठा बदल झाला नाही
  9. 8 जून रोजी सोन्यात 400 रुपयांची घसरण झाली, भाव 60,370 रुपयांवर स्थिरावला
  10. 9 जून रोजी सोन्याने 400 रुपयांची चढण चढली होती
  11. 10 जून रोजी सोन्याचा भाव 60,700 रुपये होता. त्यानंतर भाव घसरले.
  12. 10, 12 आणि 14 जून रोजी अनुक्रमे 130,100 आणि 400 रुपयांची घसरण झाली.
  13. 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त होऊन 59,820 रुपयांवर पोहचले
  14. 16 जून रोजी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही

आता भाव सोमवारी जाहीर होणार इंडियन बुलियन ज्वैलर्स असोसिएशन (IBJA) आता सोमवारी भाव जाहीर करेल. केंद्र सरकारद्वारे घोषीत सुट्या, शनिवार-रविवार या दिवशी भाव जाहीर करण्यात येत नाही.

शुक्रवारी असा होता भाव या आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोन्याने उसळी घेतली. 22 कॅरेट सोने 400 रुपयांनी वधारुन 55,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर 24 कॅरेट सोने 440 रुपयांनी महागले. हा भाव 60,260 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आज सकाळच्या सत्रातील भावाची अपडेट उपलब्ध झाली नाही. शनिवार-रविवार सोने-चांदीचे भाव अपडेट होत नाहीत. गुडरिटर्न्सनुसार हे दर आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 24 कॅरेट सोने 59582 रुपये, 23 कॅरेट 59343 रुपये, 22 कॅरेट सोने 54577 रुपये, 18 कॅरेट 44687 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34856 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.