टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा Instagram वर केवळ एकालाच फॉलो करतात कोण आहे तो बंदा !

टाटा ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी रतन टाटा आहेत. हा ट्रस्ट 1919 मध्ये स्थापन झाला होता. टाटा ट्रस्टचे देशातील सामाजिक योगदान खूप मोठे आहे.

टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा Instagram वर केवळ एकालाच फॉलो करतात कोण आहे तो बंदा !
ratan_tataImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:52 AM

मुंबई : टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा  ( RATAN TATA )  यांना इतर उद्योगपतींहून जास्त आदर दिला जातो तो त्यांच्या चॅरीटीमुळे. चॅरिटीच्या कामांना निधीची कमतरता पडू नये म्हणून या उद्याेजक घराण्याने आपलया उत्पन्नातील मोठा हिस्सा एकप्रकारे दानच केला आहे. म्हणूनच रतन टाटा सोशल मिडीयावर ( SOCIAL MEDIA  ) फारसे सक्रीय नसले सर्वाधिक फॅन फॉलोईंग असणारे उद्योगपती आहेत. इंन्स्टाग्रामवर त्यांच्या फोलोअरची संख्या 8.5 दशलक्ष ( 85 लाख ) आहे. परंतू असे असले तरी ते इंन्स्टाग्रामवर ( Instagram )  केवळ एकाचे प्रोफाईलला फोलो करतात. कोण आहे ती व्यक्ती चला पाहूया

देशाला जडणघडणीत सर्वाधिक हातभार असलेल्या टाटा घराण्याचा इतिहास मोठा आहे. तसे रतन टाटा सोशल मिडीयावर फारसे अॅक्टीव नसले तरी देशभरातील सर्व थरात त्यांचे निस्सीम चाहते आहेत. या देशात अनेक उद्योगपती आहेत,त्यांचे सोशल मिडीयावर फॅन फोलोअरही आहेत. परंतू टाटा सन्सचे माजी चेअरमन असलेल्या रतन टाटा यांचे इंस्टाग्रामवर 85 लाख फोलोअर असले तरी ते मात्र एकाच प्रोफाईलला फोलो करतात, ती प्रोफाईल आहे. एका धर्मादाय संस्थेची. त्या संस्थेचे नाव अर्थातच टाटा ट्रस्ट असे नाव आहे.

टाटा सन्सचे फार मोठे योगदान

टाटा ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी रतन टाटा आहेत. हा ट्रस्ट 1919 मध्ये स्थापन झाला होता. टाटा ट्रस्टचे देशातील सामाजिक योगदान खूप मोठे आहे. या ट्रस्टला निधीची कमतरता पडू नये म्हणून 1892  मध्येच त्याची मुहूर्तमेढ झाली होती. टाटा समूहातील सर्व कंपन्यांची मुख्य गुंतवणूकदार टाटा सन्स ही कंपनी आहे. टाटासन्सची 66 टक्के शेअर टाटा ट्रस्टकडे आहे. त्याप्रमाणे टाटा ट्रस्टला डिविडन्ड मिळत असतो. त्यामुळे अनेक चॅरिटेबल समाजपयोगी केली जातात. सामाजिक कामासाठी जरा देखील निधी कमी पडू दिला जात नाही.

अनेक सामाजिक ट्रस्टमधून चॅरिटी

अनेक दशकांपासून देशातील आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, समुदाय विकास या क्षेत्रात टाटांच्या सामाजिक ट्र्स्ट हिरीरीने सहभाग घेत असतो. या सामाजिक संस्थामध्ये जेएन टाटा एंडोमेंट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट, लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट, लेडी मेहेरबाई डी. टाटा एज्युकेशन ट्रस्ट, जेआरडी आणि थेल्मा जे. टाटा ट्रस्ट आदी प्रमुख नावे आहेत. टाटा समूहाने देश हिताचा विचार स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच केला होता. म्हणूनच जमशेदजी टाटा यांनी 1898 साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती, या संस्थेचा उद्देशच अत्याधुनिक विज्ञान शिक्षणाची भारतात पायारोवणी करणे हा होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.