IPO News : तगड्या कमाईसाठी व्हा तयार, ही सराकरी कंपनी करणार मालामाल, लवकरच आयपीओ बाजारात

IPO News : गुंतवणूकदारांना तगड्या कमाईची संधी चालून आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीचा आयपीओ बाजारात येत आहे.

IPO News : तगड्या कमाईसाठी व्हा तयार, ही सराकरी कंपनी करणार मालामाल, लवकरच आयपीओ बाजारात
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 7:08 PM

नवी दिल्ली : आयपीओ बाजारात (IPO Market) गेल्या काही दिवसांपासून सुस्त वातावरण होते. गेल्या काही दिवसांत काही आयपीओ वगळता इतरांनी गुंतवणूकदारांची घोर निराश केली. नाव मोठं अन् लक्षण खोटं असा हा सर्व मामला होता. पण आता या सरकारी कंपनीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीसंबंधीत एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) गुंतवणूकदारांना कमाईची संधी घेऊन येत आहे. ही कंपनी इनिशियल पब्लिक ऑफर (NGEL IPO) घेऊन येत आहे. या कंपनीला बाजारातून मोठा निधी जमा करायचा आहे. त्यामुळे कंपनी आयपीओ बाजारात नशीब आजमावत आहे.

आयपीओमागील नेमकं कारण मलेशियातील Petronas ने एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील 20 टक्के हिस्सेदारी मागे घेतली आहे. त्यामुळे एनटीपीसीच्या या सहायक कंपनीने आयपीओ बाजारात डाव टाकण्याचा हा प्रयत्न सुरु केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, Petronas ने दोन कंपन्या, REC Ltd आणि Indraprastha Gas Limited मध्ये गुंतवणूक केली आहे.

NTPC ची मोठी तयारी सूत्रांच्या माहितीनुसार, एनटीपीसीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 6000 कोटी रुपये मूल्य असलेल्या संपत्तीची विक्री योजना आखली आहे. या योजनेत एनजीईएलचा आईपीओचा (NGEL IPO) समावेश आहे. 17 मार्च रोजी झालेल्या कॅबिनेटच्या आर्थिक घडामोडींशी संबंधित समितीने एनजीईएलमध्ये एनपीटीसीद्वारे 5000 कोटी मर्यादेपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखविला आहे.

हे सुद्धा वाचा

अक्षय उर्जेत मोठे पाऊल NTPC ची अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि मालमत्ता NGEL कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. 2022-23 आर्थिक वर्षाच्या शेवटी, NTPC च्या सुमारे 15 अक्षय ऊर्जा प्रकल्पांना हस्तांतरीत करण्यात आले आहे. NGEL ही स्वच्छ उर्जा निर्मिती करणारी भारताची आघाडीची कंपनी ठरेल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी NGEL कडे उपकंपन्या आणि संयुक्त उपक्रम देण्यात येतील. 2032 पर्यंत 60 GW नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता आणि 130 GW एकत्रित ऊर्जा साध्य करण्याचे NTPC चे लक्ष्य आहे. ही कंपनी अणुऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, ई-मोबिलिटी आणि वेस्ट-टू-वेल्थ प्रकल्पांवरही काम करत आहे.

यंदा इतक्या कंपन्या मैदानात 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. अनेक कंपन्याचे आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात 54 कंपन्या आयपीओ घेऊन येत आहे. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळणार आहे. या 54 कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली आहे. या कंपन्या बाजारातून 76,189 कोटी रुपये जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय अजून 19 इतर कंपन्या प्रतिक्षेत आहेत. या कंपन्या सेबीकडून मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या कंपन्या 32,940 कोटी रुपये जमा करण्याच्या तयारीत आहेत.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.