Iran-Israel युद्धाने बदलली जगाची समीकरणं; सोने-चांदीची रेकॉर्डब्रेक चाल; मग गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे का?

Gold-Silver Buying : इराण-इस्त्रायल युद्धाचे धग वाढली असली तरी सोने-चांदीत तेजी कायम आहे. शेअर बाजारावर या युद्धाचा विपरीत परिणाम दिसून आला. पण मौल्यवान धातुची घोडदौड सुरूच आहे. मग अशावेळी या बेशकिंमती धातुत गुंतवणूक करणे योग्य ठरेल का?

Iran-Israel युद्धाने बदलली जगाची समीकरणं; सोने-चांदीची रेकॉर्डब्रेक चाल; मग गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे का?
गुंतवणुकीची हीच योग्य वेळ?
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 12:19 PM

Iran-Israel युद्धाने जगाला चिंतेत टाकले आहे. त्याचा थेट परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला भारतीय शेअर बाजारात गुरुवारी भुकंप आला तर आजच्या सकाळच्या सत्रात पडझड कायम आहे. पण देशात सणासुदीचा हंगाम असल्याने सोने आणि चांदीत तेजीचे सत्र कायम आहे. गुरुवारी सोन्याने मोठी उसळी घेतली. दोन दिवसात सोने 600 रुपयांच्या घरात वधारले. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धातुत सर्वकालीन तेजी दिसून आली. मग अशावेळी सोन्यात गुंतवणूक योग्य ठरेल का?

14 वर्षात जोरदार परतावा

कामा ज्वेलर्सचे मुख्य कॉलिन शाह यांच्या मते गेल्या 14 वर्षांत सोन्याने जोरदार रिटर्न दिला आहे. जगभरात सोने हे अनेक शतकांपासून गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानण्यात येते. सोन्याला उगीच संपत्ती म्हणत नाहीत. जागतिक युद्धाचे सर्वत्र पडसाद दिसत आहेत. शेअर बाजार कोसळला आहे. पण देशातील बाजारात सोने आणि चांदीत तेजीचे सत्र आहे.

हे सुद्धा वाचा

मग गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य?

यंदा आतापर्यंत सोन्याने भारतीय रुपयांत 29 टक्क्यांहून अधिक तर अमेरिकन डॉलरमध्ये 28 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. चालू आर्थिक वर्षातील नफा हा गेल्या 14 वर्षांतील सर्वात अधिक आहे. गेल्या 15 वर्षात सोन्याने सरासरी 11.7 टक्क्यांचा परतावा दिला आहे. यंदाच्या परताव्याकडे पाहता सोन्याने रिटर्न देण्यात निफ्टीला पिछाडीवर टाकले आहे.

जागतिक पातळीवर सोन्याची भरारी

सध्या मध्य-पूर्वेत आणि रशिया-युक्रेन सारखी भू राजकीय वाद सुरू आहेत. तरीही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या जागतिक स्तरावर सोने 2700 डॉलरच्या जवळपास आहे. तर ते लवकरच 3000 डॉलरच्या घरात पोहचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात सणासुदीच्या काळात सोने उच्चांकी भरारी घेऊ शकते, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,615, 23 कॅरेट 75,312, 22 कॅरेट सोने 69,263 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,711 रुपये, 14 कॅरेट सोने 44,235 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,671 रुपये इतका आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.