बड्या हुद्यावरील अनिवासी भारतीयाचा भीम पराक्रम; इंग्लंडच्या राजाला संपत्तीत टाकले पिछाडीवर
King Charles-PM Rishi Sunak Networth : कधीकाळी ब्रिटनच्या राजाचा सूर्य कधी मावळत नसल्याची म्हण होती. म्हणजे जगातील अनेक देश त्याचे अंकित होते. आजही या राजाकडे गडगंज संपत्ती आहे. पण त्याला एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने श्रीमंतीत मागे टाकले आहे.
संडे टाईम्सने श्रीमंतांची नवी यादी जाहीर केली आहे. या श्रीमंतांच्या यादीत ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले. या दोघांच्या संपत्तीत जवळपास 1287 कोटी रुपयांची वाढ झाली. आता नवीन यादीत त्यांची अंदाजित एकूण संपत्ती 2023 मधील 529 युरोवरुन 651 युरोवर म्हणजे 6867 कोटीर रुपयांवर पोहचली आहे.
राजालाच टाकले मागे
नवीन आकेडवारीनुसार, ऋषी सुनक यांनी श्रीमंतीत, त्यांच्या देशाचा राजा किंग चार्ल्स तिसरा याला मागे टाकले आहे. संडे टाईम्सने ब्रिटनमधील श्रीमंतांची एक वार्षिक यादी जाहीर केली. त्यात गेल्या वर्षी चार्ल्स तिसरा याला सुनक कुटुंबापेक्षा वरचे स्थान मिळाले होते. यंदा मात्र राजाच्या संपत्तीत मामुली वाढ नोंदवल्या गेली. राजाची संपत्ती 10 दशलक्ष युरोवरुन 610 दशलक्ष युरोपर्यंत वाढली आहे.
दोन वर्षांपूर्वी पण केला रेकॉर्ड
वर्ष 2022 मध्ये ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची संपत्ती दिवंगत महाराणीपेक्षा पण अधिक होती. त्यावर्षी एलिझाबेथ द्वितीय यांची संपत्तीचे मूल्य 370 दशलक्ष युरो होते. सुनक या यादीत गेल्या 35 वर्षांतील आघाडीचे पहिले राजकीय नेते ठरले आहेत.
सुनक यांच्या संपत्तीत इतकी वाढ कशी
ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीतील वाढ इन्फोसिसमधील मूर्ती यांच्या वाढलेल्या हिस्सामुळे आहे. इन्फोसिस ही 70 अब्ज डॉलरची भारतीय आयटी कंपनी आहे. अक्षता मूर्तीचे वडील एनआर नारायण मूर्ती हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. कंपनीत अक्षता मूर्ती यांचा पण वाटा आहे. गेल्या वर्षी या कंपनीतील अक्षताच्या शेअरचा वाटा 108.8 दशलक्ष युरोवरुन वाढून 590 दशलक्ष युरो इतका झाला होता. गेल्या वर्षी मात्र त्यांना इतका फायदा झाला नव्हता.
ब्रिटनमधील श्रीमंतांच्या संपत्तीत घसरण
संडे टाईम्सच्या वार्षिक अहवालानुसार, ब्रिटनमधील अब्जाधीशांच्या संख्येत सलग दुसऱ्या वर्षी घसरण आली आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये पण त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली होती. इंग्लंडमध्ये 2022 मध्ये 177 अब्जाधीश होते. गेल्यावर्षी त्यांची संख्या घसरुन 171 तर या वर्षी त्यात पुन्हा घसरण होऊन ती 165 वर स्थिरावली आहे.