महागाई आणखी भडकणार! जीएसटीचा सर्वात कमी स्लॅब आठ टक्के करण्याचा विचार; ‘या’ वस्तू होऊ शकतात महाग

अर्थव्यवस्था अद्यापही कोरोना संकटातून बाहेर आलेली नाहीये, महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पेट्रोल (Petrol) पासून ते खाद्यतेलापर्यंत (Edible Oil) सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. यातच आता चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सरकार जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे.

महागाई आणखी भडकणार! जीएसटीचा सर्वात कमी स्लॅब आठ टक्के करण्याचा विचार; 'या' वस्तू होऊ शकतात महाग
निर्मला सितारमण, अर्थमंत्री
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 10:58 PM

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था अद्यापही कोरोना संकटातून बाहेर आलेली नाहीये, महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पेट्रोल (Petrol) पासून ते खाद्यतेलापर्यंत (Edible Oil) सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. यातच आता चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सरकार जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. नव्या बदलानुसार जीएसटीचा सर्वात कमी स्लॅब (GST Slab) 5 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. तसेच जीएसटी प्रणालीतील काही सवलतींची यादी देखील कमी करण्यात येणार आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार राज्यांच्या अर्थमंत्र्यांची समिती या महिन्याच्या अखेरीस आपला अहवाल जीएसटी परिषदेला सादर करू शकते. यामध्ये सरकारचा महसूल वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवण्यात आले आहेत. यामध्ये जीएसटी स्लॅब वाढवण्याच्या मागणीचा देखील समावेश आहे.

महसूलात 1.50 लाख कोटींची वाढ

सध्या जीएसटीचा सर्वात कमी स्लॅब पाच टक्के आहे. मात्र जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीमध्ये प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पाच टक्के स्लॅब रद्द करून तो आठ टक्के करण्यात येईल. म्हणजेच जीएसटीचा सर्वात कमी स्लॅब हा आठ टक्के असणार आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार जीएसटीचा स्लॅब पाच टक्क्यांहून आठ टक्क्यावर आणल्यास महसुलात मोठी वाढ होणार आहे. यामुळे सरकारला 1.50 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक महसूल मिळू शकतो. एक टक्का वाढ केल्यास वर्षाला 50,000 कोटी रुपयांचा महसूल मिळतो, या स्लॅबमध्ये प्रामुख्याने पॅक केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश होतो.

…तर या वस्तू होणार महाग

जीएसटीच्या पाच टक्के स्लॅबमध्ये प्रामुख्याने पॅकबंद खाद्यपदार्थांचा समावेशे होतो. जीएसटीचा पाच टक्के स्लॅब हटवून त्या जागी आठ टक्क्यांचा स्लॅब आणल्यास पॅक बंद खाद्यपदार्थ, साखर, तेल, मसाल्याचे पदार्थ, कोळसा, चहा आयुर्वेदिक औषधी, अगरबत्ती, मिठाई, सुखामेवा, लाईफबोट यासारख्या वस्तू महाग होण्याचा अंदाज आहे. जीएसटी परिषदेची बैठक या महिन्याच्या शेवटी किंवा एप्रील महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जीएसटी स्लॅब वाढीसंदर्भात निर्यण होण्याची शक्यता आहे. जीएसटी स्लॅब वाढल्यास त्याचा मोठा बोजा हा सर्वसामान्य नागरिकांवर पडू शकतो.

संबंधित बातम्या

येत्या वर्षात 25 हजार भारतीयांना नोकरी देणार डेन्मार्कची ‘ही’ कंपनी, महसुलाच्या दुप्पट वाढीचे लक्ष

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची आर्थिक कोंडी? सविस्तर वाचा काय होतील परिणाम

नॅनो नंतर आता इलेक्ट्रिक नॅनो लवकरच येणार बाजारात? गाडी पाहून रतन टाटा म्हणाले…

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.