Multibagger Stocks : धागा धागा पैसा जोडते नवा, तुमच्याकडे पण हा शेअर हवा!

Multibagger Stocks : या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. सिंथेटिक धागे तयार करणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांचे नशीब उघडले आहे.

Multibagger Stocks : धागा धागा पैसा जोडते नवा, तुमच्याकडे पण हा शेअर हवा!
फायदा जोरदार
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 5:44 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) सातत्याने चढउतार होत आहे. सिंथेटिक धागा (Synthetic Yarn) तयार करणाऱ्या या दिग्गज कंपनीच्या शेअरने जोरदार उसळी घेतली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण दिसून येत आहे. पण आता या शेअरने पुन्हा उसळी घेतली आहे. या कंपनीत एक लाख रुपये गुंतवणूक करणारे आज करोडपती झाले आहेत. येत्या काही दिवसांत हा शेअर पुन्हा आगेकूच करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बाजारातील गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते. त्यामुळे योग्य अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला अत्यंत मोलाचा ठरतो.

फिलाटेक्स इंडिया (Filatex India) असे या कंपनीचे नाव आहे. ही सिथेंटिक धागा तयार करणारी दिग्गज कंपनी आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. आज या कंपनीचे एकूण बाजारातील भाग भांडवल 1,553.20 कोटी रुपये आहे. सध्याच्या काळात या कंपनीचा शेअर बीएसईवर 35.06 रुपये आहे. सोमवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची वाढ झाली.

असे झाले करोडपती

हे सुद्धा वाचा

फिलाटेक्स इंडियाच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कोट्याधीश केले. 12 एप्रिल 2002 रोजी या कंपनीचा शेअर केवळ 25 पैसे होता. गेल्या वर्षी म्हणजे 2022 च्या डिसेंबर महिन्यात हा शेअर 1:2 या प्रमाणात स्प्लिट झाला. सध्याच्या काळात हा शेअर 35.06 रुपये आहे. गेल्या 21 वर्षात या शेअरमध्ये 12540 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीत सुरुवातीला एखाद्याने 80 हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तो आज कोट्याधीश झाला असता. या शेअरने 12 एप्रिल रोजी 69.20 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण दिसून आली.

पुन्हा रॉकेट भरार

तज्ज्ञांचे मते, येत्या काही दिवसात फिलाटेक्स इंडियाचा शेअर रॉकेट भरारी घेईल. त्यामध्ये जोरदार तेजी दिसून येईल. ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर राखून ठेवला आहे. त्यांना शॉर्ट टर्ममध्ये फायदा करायचा असेल तर येत्या काही दिवसांत हा शेअर मालामाल करु शकतो. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करा. तसेच बाजारातील तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या. नाही तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

पीएसयु सेक्टरची जोरदार सलामी

केवळ खासगी कंपन्यांच नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांनी (PSU stock) पण गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअर बाजारात (Share Market) अनेक कंपन्या चांगला परतावा देतात. पण पीएसयू शेअर्सनी त्यांना सुरक्षित गुंतवणुकीसह त्यांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून, 2011 पासून या कंपन्यांनी लाभांश दिला आहे. काही पीएसयू स्टॉक्सने तर 32 वेळा लाभांश दिला आहे. जोरदार परतावा, सरकारी कंपनी, लाभांश असा हा कमाईचा पॅटर्न अनेक वर्षांपासून सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.