Hindustan Unilever : नावात हिंदुस्तान, मनात ब्रिटेन-नेदरलँड! प्रत्येक घरात याच कंपनीचा माल

Hindustan Unilever : कंपनीचे नाव माहिती नसले, तरी प्रत्येकाच्या घरातील चार पाच उत्पादने तरी याच कंपनीचे आहेत. गोरे साहेब तर देश सोडून गेले. पण त्यांच्या कंपनीचे राज्य मात्र अजूनरही कायम आहे. काय आहे या कंपनीचा इतिहास, कसा वाढला पसारा, भारत कसा झाला फेव्हरेट देश, वाचाच..

Hindustan Unilever : नावात हिंदुस्तान, मनात ब्रिटेन-नेदरलँड! प्रत्येक घरात याच कंपनीचा माल
नाम तो सुना ही होगा
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 11:10 AM

नवी दिल्ली : लाईफबॉय, सर्फ एक्सेल, लिरिल, पेप्सोडेंट, क्लोज अप व्हील आणि इतके प्रकारचे उत्पादने, तुम्ही वापर असाल की, तुम्हाला माहिती नसेल की आपण घरात एकाच कंपनीचे अनेक उत्पादने घरात घेऊन येत आहोत ते. आज ही कंपनी मेगा एम्पायर आहे. तर तुमच्या घरात अनेक प्रकारचे उत्पादने हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे (Hindustan Unilever Company-HUL) आहेत. देशातील दहा पैकी 9 घरात या कंपनीच्या उत्पादनांचा वापर होतोच होतो. या कंपनीच्या नावावरुन तर ही कंपनी तुम्हाला भारतीय वाटेल. पण ही कंपनी भारताची नाही. या कंपनीचे ब्रिटेन-नेदरलँडशी (Britain, Netherlands) काय कनेक्शन आहे? चला तर पाहुयात देशात 90 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या या कंपनीचा इतिहास

नावातच हिंदुस्तान, कंपनी ॲंग्लो-डच

युनिलिव्हर ही हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीची मूळ कंपनी आहे. हा ब्रँड HUL या नावाने ओळखल्या जातो. या कंपनीचा इतिहास पार 18 व्या शतकातील आहे. 1888 साली ब्रिटेनमधील ‘लिव्हर ब्रदर्स’ ने साबण तयार करण्याचा कारखाना काढला. त्यांनी लिव्हर ब्रदर्सची कंपनी सुरु केली. अत्यंत कमी कालावधीत त्यांची सनलाईट साबण घरोघरी पोहचली. ही साबण पुढे भारतातही लोकप्रिय झाली. 1930 साली भारतात स्वदेशी आंदोलन जोरात सुरु होते. त्यामुळे युनिलिव्हरला मोठा फटका बसला. विक्रीत घसरली.

हे सुद्धा वाचा

आयडियाची लढवली शक्कल

आता भारतात तर ब्रिटिशविरोधी भावना प्रबळ होती. भारत स्वातंत्र्यासाठी झगडत होता. त्यामुळे याठिकाणी माल खपवणे सोपे नाही हे लिव्हर ब्रदर्सच्या लक्षात आले. त्यांनी एक आयडिया वापरली. भारतात डालडा हा ब्रँड प्रसिद्ध होता. नेदरलँडची कंपनी मार्जरिन युनि हे उत्पादन तयार करते होते. लिव्हर ब्रदर्सनी या कंपनीत त्यांची कंपनी विलीन केली. त्यानंतर या कंपनीला युनिलिव्हर हे नाव दिले. नावातील या बदलाने भारतातच नाही तर संपूर्ण आशियात कंपनीला मोठा फायदा झाला. कंपनीची विक्री पुन्हा वाढली.

1933 मध्ये लिव्हर्स ब्रदर्सने युनिलिव्हर नावाने भारतात नांगर टाकला. 1934 मध्ये मुंबईतील शिवडी येथे कंपनीने पहिली साबणाची फॅक्टरी उभारली. त्यावेळी देशात हिंदुस्तान वनस्पती उत्पादन कंपनी, लिव्हर ब्रदर्स इंडिया लिमिटेड, युनायटेड ट्रेडर्स लिमिटेड या देशात तीन वेगवेगळ्या कार्यरत होत्या. या तीनही कंपन्यांचे नोव्हेंबर 1956 मध्ये एकत्रीकरण करण्यात आले. हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड असे या कंपनीचे नाव झाले. विशेष म्हणजे, या कंपनीत भारतीयांचा 10 टक्के वाटा आहे. त्यानंतर 2007 साली कंपनीने नावात बदल केला. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या नावाने हा बदल झाला.

कंपनीने भारतात इतर अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या. त्यांचे अधिग्रहण केले. 1972 मध्ये लिप्टन कंपनी खरेदी केली. त्यानंतर पोन्ड्स लिमिटेड ही कंपनी 1986 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये सहभागी झाली. त्यानंतर अनेक उत्पादनांची सुरुवात झाली. 1992 मध्ये युनिलिव्हर नेपाल लिमिटेड ही उपकंपनी नेपाळसाठी तयार करण्यात आली. 1994 मध्ये कंपनीचा विस्तार झाला. कंपनीने टाटा समूहाकडून टाटा ऑईल मिल्स खरेदी केली. त्यानंतर कंपनी सौंदर्य प्रसाधनाच्या बाजारात उतरली. तिने लॅक्मे हा ब्रँड खरेदी केला. आज या कंपनीकडे 50 हून अधिक उत्पादने आहेत.

या कंपनीच्या उत्पादनावर अनेकदा प्रश्नचिन्ह लावण्यात आली आहेत. ही कंपनी केमिकलचा अतिरेक करत असून त्यामुळे भारतीयांच्या जीवनात रसायनांचा अप्रत्यक्ष वापर वाढल्याचा आरोप करण्यात येतो. या कंपनीच्या तामिळनाडू येथील कोडाईकनाल येथील थर्मामीटर फॅक्टरीतून दुषित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मरक्युरी वेस्ट डंप केल्याचा आरोपही कंपनीवर लावण्यात आला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.