LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महाग झाला आहे.

LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
गॅसवरील सबसीडी कशी मिळवाल?Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 7:13 AM

महागाई गगनाला भिडली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने (OMCs) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात (LPG Gas Cylinder Price) वाढ केली आहे. प्रति सिलिंडर 104 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही दर वाढ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झाली नसून ती व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून भाव स्थिर आहेत. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने भाववाढ सुरूच आहे. गेल्या एक मार्चला व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 268.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर आज पुन्हा एकदा व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महागला आहे. नव्या दरानुसार आता व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 2,355 रुपयांवर पोहोचले आहेत.

महागाईचा भडका उडणार

दरम्यान आज व्यवसायिक गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा एकदा 104 रुपयांची वाढ झाल्याने महागाईचा भडका उडणार आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्ये आधीच वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. आता व्यवसायिक सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मार्च महिन्यात देखील व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 268.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिवसेंदिवस दरवाढ होत असल्याने आता हॉटेलमधील जेवण देखील महाग होणार आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

आज व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलेच दर आज देखील स्थिर आहेत. सलग 26 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्व सामान्यांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची दरवाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ करण्यात आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.