Gold Silver Rate Today : सोन्याचा मूड स्विंग! भावात सातत्याने बदल, आज इतकी झाली दरवाढ
Gold Silver Rate Today : सध्या सोन्याचा मूड स्विंग, म्हणजे स्थिर नाही. सोने-चांदीचे भाव सातत्याने बदलत आहेत. सकाळी एक तर संध्याकाळी एक भाव यामुळे ग्राहकांना अंदाज बांधणे कठीण होत आहे.
नवी दिल्ली : सध्या सोन्याचा मूड स्विंग, म्हणजे स्थिर नाही. सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price) सातत्याने बदलत आहेत. सकाळी एक तर संध्याकाळी एक भाव यामुळे ग्राहकांना अंदाज बांधणे कठीण होत आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव वधारला असून चांदीत कोणताही बदल झालेला नाही. 2 जून रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. तर चांदीने पण दरवाढीचे खाते उघडले. किलोमागे चांदी 600 रुपयांनी वधारली. 31 मे रोजी आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीने भाव वाढ नोंदवली होती. आज 3 जून रोजी सकाळच्या सत्रात भाव जाणून घेऊयात..
भावात अशी वाढ goodreturns च्या आकडेवारीनुसार, 31 मे आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदी वधारली होती. तर 1 जून रोजी संध्याकाळच्या सत्रात चांदीत 150 रुपयांची घसरण झाली होती. 2 जून रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ झाली. आज 3 जून रोजी सकाळच्या सत्रात भावात 10 रुपयांची वाढ झाली. आता संध्याकाळपर्यंत दोन्ही धातूत काय बदल होतो, हे स्पष्ट होईल. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 56,160 रुपये तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 61,260 रुपये झाले.
24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,308 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,067 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,242 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,231 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
गेल्या 6 वर्षांत इतकी घसरण सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.
भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.