Silver Record : चांदीने रचला इतिहास! किंमतीचा नवीन रेकॉर्ड

| Updated on: Apr 05, 2023 | 8:24 PM

Silver Record : सोन्याचा आलेख सध्या चढता आहे. पण गेल्या तीन महिन्यात सोन्यापेक्षा चांदी भाव खाऊन गेली आहे. सोन्यापेक्षा चांदीने अधिक परतावा दिला आहे. आता चांदीने भावात पुन्हा नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.

Silver Record : चांदीने रचला इतिहास! किंमतीचा नवीन रेकॉर्ड
चांदीची मुसंडी
Follow us on

नवी दिल्ली : सोन्याचा आलेख (Gold Price) सध्या उंचावला आहे. गेल्या एक महिन्यातील मरगळ झटकून सोन्याने भावात नवीन विक्रम तयार केला. पण सोन्यापेक्षा चांदीने अधिक परतावा दिला आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीतील गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. गेल्या तीन महिन्यात सोन्यापेक्षा चांदी भाव खाऊन गेली आहे. सोन्यापेक्षा चांदीने अधिक परतावा दिला आहे. आता चांदीने भावात पुन्हा नवीन रेकॉर्ड (Silver Price New Record) तयार केला आहे. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. त्यानंतर 19, 20 मार्च रोजी चांदीने पहिल्यांदात 73,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. पण आता चांदीने लांब उडी मारली आहे.

आजच्या किंमतीत किती तफावत
गुडरिटर्न्सनुसार, 5 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. 22 कॅरेट सोन्याचा भाव आज सकाळच्या सत्रात 55,450 रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर आज संध्याकाळी भावाने जोरदार उसळी घेतली. हा भाव 56,400 रुपये प्रति तोळा झाला. तोळ्यामागे 950 रुपयांनी भाव वधारले. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 60,480 रुपये होता. संध्याकाळी हा भाव 61,510 रुपये झाला. 1,030 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली. सोन्याच्या भावात सातत्याने चढउतार होत आहे.

चांदीची जोरदार मुसंडी
चांदीने सोन्यापेक्षा अधिक परतावा दिला आहे. चांदीने भावात नवीन विक्रम केला आहे. चांदीने किंमतीत जोरदार मुसंडी मारली. आज सकाळी हा भाव हा भाव 74600 रुपये प्रति किलो होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. 4 एप्रिल रोजी एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये होता. गुडरिटर्न्सनुसार, 5 एप्रिल रोजी संध्याकाळी एक किलो चांदीचा भाव 77,090 रुपयांवर पोहचला. आयबीजेएच्या संकेतस्थळानुसार, चांदीचा भाव संध्याकाळी 73,834 रुपये प्रति किलो होता.

हे सुद्धा वाचा

सोन्यावर केली कुरघोडी
सोने जोरदार रिटर्न (Gold Return) देईल, असा सर्वांना वाटत असताना चांदीने सोन्यावर कुरघोडी केली. परतावा देण्यात चांदी आघाडीवर आहे. सोन्याचा भाव 60,455 रुपयांच्या पुढे गेला होता. सोन्याने भावात एक विक्रम केला होता. पण कमाई झाली ती चांदीमुळे. मार्च महिन्यातील 30 दिवसांत गुंतवणूकदारांना जास्तीतजास्त 12 टक्के परतावा दिला आहे. तर सोन्याने जवळपास 7 टक्के परतावा दिला आहे.

हॉलमार्क घ्या जाणून
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.