Expensive Share : शेअर बाजारातील हा सर्वात महागडा स्टॉक, किंमत एक लाखांच्या घरात

Expensive Share : किरकोळ गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये आपली गुंतवणूक असावी असे वाटते, पण त्यांना हा शेअर खरेदी करता येत नाही. कारण या स्टॉकची किंमत एक लाखांच्या घरात आहे. हा भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागडा शेअर आहे.

Expensive Share : शेअर बाजारातील हा सर्वात महागडा स्टॉक, किंमत एक लाखांच्या घरात
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 11:44 AM

नवी दिल्ली : किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) या स्टॉकमध्ये आपली गुंतवणूक असावी असे वाटते, पण त्यांना हा शेअर खरेदी करता येत नाही. कारण या स्टॉकची किंमत एक लाखांच्या घरात आहे. हा भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागडा शेअर (Expensive Share) आहे. गेल्या दोन दिवसांत या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. या शेअरमध्ये 7 टक्क्यांची वाढ दिसली. सध्या एका स्टॉकची किंमत 94,875 रुपये आहे. हा शेअर आता त्याच्या सर्वकालीन उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. आता तुम्ही म्हणाल, इतका महागडा स्टॉक, कोणत्या कंपनीचा आहे आणि या कंपनीचे उत्पादन तरी काय आहे.

ही आहे कंपनी MRF ही ती कंपनी आहे. एमआरएफ कंपनीचे टायर तर अनेकांनी त्यांच्या दुचाकी, चारचाकीसाठी खरेदी नक्कीच केले असेल. तर या कंपनीचा शेअर भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागडा स्टॉक आहे. चौथ्या तिमाहीत या कंपनीने जोरदार मुसंडी मारली. FY23 च्या मार्च तिमाहीत एमआरएफला तगडा फायदा झाला. या कंपनीचा नफा 162 टक्क्यांनी वाढून 410.66 कोटी रुपयांवर पोहचले.

जोरदार लाभांश या दरम्यान कंपनीचे ऑपरेटिंग परफॉर्मन्स जोरदार राहिला. तर वार्षिक आधारावरील महसूल 10 टक्क्यांनी वाढून 5,725.4 कोटी रुपयांवर पोहचला. ही कंपनी गुंतवणूकदारांना मोठा लाभांश देणार आहे. या कंपनीने शेअर होल्डर्सला प्रत्येक शेअरमागे 169 रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा

तिमाही निकाल जोरदार पण या कंपनीचा शेअर खरेदीसाठी तुम्हाला जवळपास एक लाख रुपये खर्च करावे लागतील. बुधवारी MRF Ltd च्या शेअरमध्ये जवळपास दीड टक्के तेजी दिसून आली. यापूर्वी मंगळवारी पण या शेअरची जोरदार घौडदौड होती. मंगळवारी स्टॉकमध्ये 5 टक्के तेजी दिसून आली. सध्या एका शेअरची किंमत 95,000 रुपयांच्या जवळपास आहे.

उच्चांकी कामगिरी या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकी 96000 रुपयांची कामगिरी बजावली. तर हा शेअर 65,878 रुपयांच्या सर्वात निच्चांकी पातळीवर पण पोहचला आहे. या शेअरने गेल्या एका महिन्यात 13 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरमध्ये एका वर्षात जोरदार 33 टक्के उसळी दिसून आली. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या कंपनीने मालामाल केले आहे. गेल्या 20 वर्षांत या शेअरन 5000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2 मे 2003 रोजी हा शेअर 1100 रुपये होता. आता तो 95,000 रुपयांवर आहे.

का इतका महाग एमआरएफ कंपनीचा हा शेअर इतका महागडा का आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर गेल्या कित्येक वर्षांपासून या कंपनीने शेअर स्प्लिट केला नाही, हे त्यामागील प्रमुख कारण आहे. 27 एप्रिल 1993 साली हा शेअर 11 रुपयांना मिळत होता. 1970 मध्ये 1:2 आणि 1975 मध्ये 3:10 या प्रमाणात हा स्टॉक स्प्लिट झाला होता. त्यानंतर कंपनीने अद्याप स्टॉक स्प्लिट केलेला नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.