Marathi News Business The RBI changed these rules in relation to FDs, know otherwise there will be losses
PHOTO | RBI New Rule : आरबीआयने एफडीशी संबंधित बदलले हे नियम, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान
मुदत ठेवींशी संबंधित आरबीआयचा हा नवीन नियम देशातील सर्व वाणिज्य बँका, लघु वित्त बँक, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांवर लागू असेल. (The RBI changed these rules in relation to FDs, know otherwise there will be losses)
Follow us
रिझर्व्ह बँकेचे नवे परिपत्रक : एफडी मॅच्युअर झाली आणि काही कारणास्तव एफडीची रक्कम दिली गेली नाही किंवा हक्क सांगितला गेला नाही तर आरबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे. ‘बचत खात्यानुसार व्याज दर’ किंवा ‘ एफडीच्या मॅच्युरिटीवरील व्याज दर, जे कमी असेल ते लागू असेल. अर्थात यामुळे व्याज कमी होईल.
आरबीआयचा नवीन नियम देशातील सर्व वाणिज्य बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांना लागू असेल. आतापर्यंत लागू असलेल्या नियमांमध्ये बँकांकडून मुदत ठेवीची मॅच्युरिटी झाल्यास जर ग्राहक नूतनीकरणासाठी बँकेत पोहोचला नसेल तर मागील कालावधीसाठी बँक आपोआप नूतनीकरण करत असे.
अशा परिस्थितीत बँक ग्राहकही निश्चिंत राहत असत. परंतु, 2 जुलै रोजी आरबीआयने हा नियम बदलत नवे परिपत्रक जारी केले आहे. आता जर बँक ग्राहकाने एफडी समाप्त होईपर्यंत नूतनीकरण केले नाही तर सामान्य बचत खात्याप्रमाणेच एफडीवरही तेवढे व्याज मिळेल.
देशभरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, ज्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची बँकांमध्ये एफडी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज दर देण्यात येतो. परंतु नवीन नियमांनुसार जर ते वेळेवर रक्कम क्लेम करु शकले नाहीत तर त्यांना बचत खात्याच्या बरोबरीने कमी दराने व्याज मिळेल.