गृहिणींनो, तुमच्या स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित नियम बदलणार; वाचा काय होणार परिणाम?

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे इतर शहरांमध्ये स्थलांतरीत होणारे लोक, शिकण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी वास्तव्याला गेलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (The rules regarding your cooking gas will change; Read What will be the result)

गृहिणींनो, तुमच्या स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित नियम बदलणार; वाचा काय होणार परिणाम?
सिलिंडर खरेदी करा फक्त 9 रुपयात
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 6:13 PM

नवी दिल्ली : एलपीजी गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकार लवकरच एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार आपल्याला फक्त आयडी प्रूफ दाखवून नवीन एलपीजी कनेक्शन घेता येणार आहे. सध्याच्या नियमांनुसार नवीन कनेक्शनसाठी वास्तव्याचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे इतर शहरांमध्ये स्थलांतरीत होणारे लोक, शिकण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी वास्तव्याला गेलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘सीएनबीसी-आवाज’ने एका अहवालाचा हवाला देऊन ही खुशखबर दिली आहे. (The rules regarding your cooking gas will change; Read What will be the result)

अहवालात म्हटले आहे की, पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी गॅस कनेक्शनशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यासाठी विधेयक तयार केले आहे. ते तेल कंपन्यांना देण्यात आले आहे. नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याच्या नियमात शिथिलता आणण्याच्या हेतूने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. ग्राहकांना हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. त्याचबरोबर तीन सरकारी तेल कंपन्या एकत्रितपणे ‘इंटिग्रेटेड आयटी प्लॅटफॉर्म’ तयार करत आहेत, असेही ‘सीएनबीसी-आवाज’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

यापुढे वास्तव्याचा पुरावा आवश्यक नाही

एखाद्या ग्राहकाची एखाद्या कंपनीकडे गॅस सिलिंडरसाठी नोंदणी असेल, तरी तो ग्राहक दुसऱ्या किंवा तिसऱ्या कंपनीकडून सिलिंडर घेऊ शकणार आहे. एलपीजी कनेक्शन देण्याच्या नवीन नियमांमुळे प्रवासी कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. आता त्यांना केवळ नवीन आयडी पुराव्यावर नवीन गॅस कनेक्शन मिळत आहे. सध्या ज्या नागरिकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असल्यास ते सहजपणे नवीन एलपीजी कनेक्शन मिळवू शकतात. यासाठी त्यांना कायमस्वरूपी पत्त्याशी संबंधित हमी देण्याची गरज नाही.

नवीन नियमामुळे काय फायदा होईल?

पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयामागील दोन प्रमुख कारणे नमूद केली जात आहेत. असे मानले जाते की केवळ आयडी पुराव्यावर गॅस कनेक्शन मिळाल्यास शहरांमध्ये स्थलांतर करणार्‍या बहुतेक लोकांना याचा थेट फायदा होईल. त्याचबरोबर 100 टक्के एलपीजी कव्हरेजचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही सरकारला मोठी मदत होईल. यावर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती की 1 कोटी नवीन ग्राहकांना उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन दिले जातील. नव्या नियमामुळे सरकारचे 1 कोटी नवीन ग्राहकांचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.

4 वर्षांत 8 कोटी कुटुंबांपर्यंत मोफत एलपीजी कनेक्शन

देशात स्वच्छ उर्जेला प्रोत्साहन देऊन सरकारचे उद्दिष्ट 100% पूर्ण करण्यात यश येईल, अशी आशा तेल सचिव तरुण कपूर यांनी फेब्रुवारी महिन्यातच व्यक्त केली होती. गेल्या 4 वर्षात 8 कोटी घरांपर्यंत मोफत एलपीजी कनेक्शन पोहोचली आहेत. देशातील सर्व गोरगरीब कुटुंबांना मदत करण्याचा सरकारचा निर्धार आहे. देशात एलपीजी वापरकर्त्यांची एकूण संख्या 29 कोटींवर गेली आहे. (The rules regarding your cooking gas will change; Read What will be the result)

इतर बातम्या

Gold Silver Price Today | पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरांत मोठी घसरण, जाणून घ्या नवे भाव!

दिवसा शाळा, रात्री गायनपार्ट्या, लतादीदींनीही कौतुक केलेली ही गायिका माहीत आहे का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.