Rupees : डॉलरच्या दांडगाईला भारताचे उत्तर! आता या 18 देशात रुपयांत करा व्यवहार

Rupees : डॉलरला पर्यायी चलन देण्यासाठी भारतीय रुपया लवकरच बाजारात उतरणार आहे. जवळपास 18 देशात रुपयांत व्यवहार करता येणार आहे. व्यवहार करण्यासाठी रुपयाची मदत घेता येणार आहे. आंतरराष्ट्रीय चलन होण्यासाठी रुपयाने पाऊल टाकले आहे.

Rupees : डॉलरच्या दांडगाईला भारताचे उत्तर! आता या 18 देशात रुपयांत करा व्यवहार
धाकड रुपया
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 5:05 PM

नवी दिल्ली : भारतीय रुपयाने (Rupee) कात टाकली आहे. आंतरराष्ट्रीय चलन (International Currency) होण्यासाठी रुपयाची आगेकूच सुरु आहे. जगातील अनेक मोठे देश भारतासोबत व्यापारासाठी रुपयाला प्राधान्य देत आहे. डॉलर (Dollar) या व्यापारात कुठेच नाही. डॉलरच्या दांडगाईला अशाप्रकारे भारत उत्तर देण्याच्या तयारीत आहे. जवळपास 18 देशांनी रुपयांत व्यवहाराला प्राधान्य दिले आहे. रुपयातून दुसऱ्या देशात व्यापार करता यावा यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आघाडी घेतली आहे. त्यासाठी वोस्ट्रो खाते उघडण्यात येत आहे. जवळपास 18 देशांनी 60 खास रुपया वोस्ट्रो खाते (Vostro Account) उघडण्यात आले आहेत. या देशांसोबतच आता इतर अनेक मोठ्या देशांनी पण व्यवहारासाठी रुपयाला पसंती दिली आहे.

भारताचे अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, केंद्रीय बँकेने घरगुती आणि परदेशी बँकांनी रुपयात व्यापारासाठी 60 खास रुपया वोस्ट्रो खाते (SRVA) उघडण्यास मंजूरी दिली आहे. पीटीआयने विषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 49 देशांनी भारतीय रुपयात व्यवहार करण्यासाठी खाते उघडली आहेत. तर इतर अनेक देशांना परवानगीची प्रतिक्षा आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे. या खात्यांचा उद्देश रुपयाच्या माध्यमातून परदेशी व्यापार वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

भारतात एसआरव्हीए खाते उघडणाऱ्या देशांमध्ये जर्मनी, इस्त्राईल, युनायटेड किंगडम, रशिया, सिंगापूर, श्रीलंका, बोत्सवाना, फिजी, गुयाना, केनिया, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, ओमान, सेशेल्से, टंझानिया, युगांडा यांचा समावेश आहे. या यादीत अजून अनेक मोठ्या देशांचा समावेश होणार आहे. हा आकडा लवकरच 70 च्या घरात जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रुपयाविषयीची महत्वकांक्षी योजना सुरु केली होती. ज्या देशात अमेरिकन डॉलरची गंगाजळी कमी आहे. अशा देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी भारतीय रुपयांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे या देशांना भारतीय रुपयांमध्ये व्यापारी सौदे आणि व्यवहार पूर्ण करता येतील, सेटलमेंट पूर्ण करता येईल. तसेच त्यामुळे त्यांना डॉलरच्या महागाईच्या झळा पण बसणार नाहीत.

असा होईल परिणाम

  1. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार रुपयामध्ये केल्यास, रुपयाचे महत्व वाढेल.
  2. आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची घसरण थांबवता येईल.
  3. इतर चलनांपेक्षा भारतीय रुपयाची घसरण डॉलरच्या मुकाबल्यात कमी आहे.
  4. रुपयाचा वापर झाल्यास आयात खर्चात कपात होईल.
  5. सध्या रशिया आणि भारताचा व्यापार रुपयातच होत आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.