शेअर मार्केटमध्ये घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला
सलग दोन दिवसांच्या चांगल्या वाढीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार (Share Market) पुन्हा घसरला आहे. बीएसई सेन्सेक्स (BSE SENSEX) आणि एनएसई निफ्टी (NIFTY) या दोघांनीही मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला.
मुंबई – सलग दोन दिवसांच्या चांगल्या वाढीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार (Share Market) पुन्हा घसरला आहे. बीएसई सेन्सेक्स (BSE SENSEX) आणि एनएसई निफ्टी (NIFTY) या दोघांनीही मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांच्या घसरणीनंतर उघडला होता, तर एनएसई निफ्टीही रेड झोनमध्ये सुरू झाला. याआधी सलग दोन दिवस बाजाराने चांगली वाढ नोंदवली होती.
सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला
बीएसई सेन्सेक्सने गुरुवारी 57,531.95 अंकांवर व्यवहार सुरू होता. तर गुरुवारी तो 57,911.68 अंकांवर येऊन थांबला होता. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात केलेल्या विक्रीमुळे शेअर बाजार घसरल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. सकाळी पावनेदहाच्या सुमारास सेन्सेक्स 502.18 अंकांनी घसरून 57,409.50 अंकांवर होता.
निफ्टी 150 अंकांनी घसरला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 17,242.75 अंकांच्या घसरणीसह उघडला. तर गुरुवारी तो 17,392.60 अंकांवर बंद झाला होता. सकाळी सुरूवातीला घसरण आणखी वाढली आणि रात्री पावनेदहाच्या सुमारास 150 हून अधिक अंकांनी घसरून 17, 230.80 वर आला होता.
महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सर्वाधिक तोटा झाला.
घसरणीचा ट्रेंड असतानाही काही कंपन्यांचे शेअर्स सातत्याने चढते राहिले आहेत. सेन्सेक्सवरील सकाळच्या व्यवहारात, एचसीएल टेक्नॉलॉजीजचा समभाग सर्वाधिक वाढणारा म्हणून निर्माण झाला होता. तर महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सर्वाधिक तोटा झाल्याचे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचप्रमाणे, NSE निफ्टीवर, सर्वात जास्त वाढ अदानी पोर्टच्या समभागात झाली, तर सर्वात मोठी घसरण हिंदाल्कोच्या समभागात नोंदवली गेली.