Israel-Iran युद्धाचा भारतावर काय होणार परिणाम; तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

Iran ने रविवारी 14 एप्रिल रोजी इस्त्राईलवर 300 क्षेपणास्त्र डागले होते. त्याला इस्त्राईलने आज प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मध्य-पूर्वेत अजून एका युद्धाचा भडका उडाला आहे. त्याचा जगावर आणि भारतावर मोठा परिणाम होणार आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने महागाई भडकणार का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात..

Israel-Iran युद्धाचा भारतावर काय होणार परिणाम; तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
इराण-इस्त्राईल युद्धाने महागाई पुढ्यात
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 11:03 AM

Israel-Iran यांच्यामध्ये युद्ध होणार हे भाकित अखेर खरे ठरले. जगाच्या पटलावर तिसऱ्या युद्धाने बिगुल वाजवला. रशिया-युक्रेन युद्ध दोन वर्षांहून अधिक काळापसून सुरु आहे. तर हमास-इस्त्राईल संघर्ष सुरु आहे. त्यात आता इराणने पण उडी घेतली. इराणने 14 एप्रिल रोजी इस्त्राईलवर 300 क्षेपणास्त्र डागले होते. त्याचा बदला आज इस्त्राईलने घेतला. पण यामुळे जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. युरोप आणि अमेरिकेला या युद्धाच्या झळ कितपत बसतील हा संशोधनाचा विषय आहे. पण भारतीय व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होणार हे नक्की.

पेट्रोल-डिझेलवर परिणाम

  1. इराण-इस्त्राईल युद्धाचा सर्वात मोठा फटका कच्चा तेलाला बसण्याची शक्यता आहे. भारत सध्या कच्चा तेलासाठी रशियाच्या अगदी जवळ गेला आहे. तर इतर देशांकडून सुद्धा कच्चा तेलाची आयात सुरु आहे. इराणकडून तेलाची आयात गेल्या पाच वर्षांत खूप कमी झाली आहे. कच्चा तेल महागण्यासाठी हे युद्ध कारणभूत असेल असे बिझनेस टुडेच्या वृत्तात अंदाज वर्तविण्यात आला आहे.
  2. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत या चार महिन्यांतच मोठी दरवाढ झाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, 19 टक्क्यांनी कच्चा तेलाच्या किंमती वधारल्या आहेत. 12 एप्रिल 2024 रोजी किंमती 90.45 डॉलर प्रति बॅरल होत्या. तर 2 जानेवारी 2024 रोजी या किंमती 75.89 डॉलर प्रति बॅरल होत्या. युद्धाचा भडका उडाल्यास तेलाच्या आयतीवर त्याचा परिणाम होऊन इंधनाचे आतंरराष्ट्रीय बाजारातील भाव वाढू शकतील.
  3. चीन सध्या इराणकडून 15 टक्के सवलतीत कच्चा तेलाची आयात करत आहे. इराणचे हितसंबंध जपण्यासाठी चीन इराणला मदत करण्याची चिन्हे आहेत. इराण हुथी (Houthi) दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहे. त्यांनी भारतीय जहाजांना पण मध्यंतरी लक्ष केले आहे. त्याचा एकूणच परिणाम व्यापारावर झालेला आहे.

सोने-चांदीच्या किंमतींचा भडका

हे सुद्धा वाचा

या तीन युद्धामुळे अनेक देशातील मध्यवर्ती बँका सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. तर चीन त्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात चांदी आणि तांब्याची आयात करत आहे. इस्त्राईल-इराण युद्ध जास्त काळ लांबलं तर त्याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर होईल. सोने 3,000 डॉलरच्या घरात पोहचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशात सोने 80,000 रुपयांचा टप्पा ओलांडेल तर चांदी पण मोठी घौडदौड करण्याची बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

इराणशी व्यापार कमी, इस्त्राईलसोबत वाढला

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गेल्या पाच वर्षांत भारताचे इराण सोबतचे व्यापारी संबंध मजबूत असले तरी व्यापारात मोठी घट आली आहे. इराण हा भारताचा 59 व्या क्रमांकाचा मोठा भागीदार आहे. 2022-23 मध्ये दोन्ही देशांमध्ये 2.33 दशलक्ष डॉलरचा व्यापार झालेला आहे. तर इस्त्राईलसोबतचा व्यापार गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारताने व्यापारी धोरणं बदलवली आहेत. त्याचा हा परिणाम आहे.

किरकोळ वस्तूंचे भाव वाढणार

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या तर देशात दळणवळणासाठी अतिरिक्त खर्च लागेल. देशात मोठ्या प्रमाणात ट्रकच्या माध्यमातून माल वाहतूक होते. डिझेलचे दर वाढल्यास अन्नधान्यासह इतर वस्तूंच्या किंमती वाढू शकतात. देशात महागाईने अगोदरच डोकेवर काढले आहे. केंद्र सरकारच्या महागाई कमी करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका यामुळे बसू शकतो.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.