Shark Tank India : 40 कोटींची कमाई करणारी कंपनी रात्रीतूनच गायब, स्पर्धकाने सांगितली आपबित्ती, शार्क्सही झालेत भावूक, शॉर्क टँक इंडियातून मिळेल का कमाईची संधी

Shark Tank India : शार्क टँकच्या नव्या सिझनमध्ये अनेक धक्का देणारे प्रकार समोर येत आहे..

Shark Tank India : 40 कोटींची कमाई करणारी कंपनी रात्रीतूनच गायब, स्पर्धकाने सांगितली आपबित्ती, शार्क्सही झालेत भावूक, शॉर्क टँक इंडियातून मिळेल का कमाईची संधी
काय मिळेल मदत
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 9:27 PM

नवी दिल्ली : शार्क टँक इंडियाच्या सिझन 2 (Shark Tank India Season 2) जोमात सुरु आहे. या दुसऱ्या पर्वात अनेक धक्कादायक प्रकारांनी परिक्षकच नाही तर प्रेक्षकांनाही रडवले. या रियालिटी शोचा (Reality Show) एक भाग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या सिझनमधील स्पर्धकांच्या (Contestant) जिद्दीच्या, संयमाच्या आणि अनोख्या कल्पनेवर त्यांनी बजावलेल्या कामगिरीची कथा आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. तर काही कथा आपल्याला भावनिक करणाऱ्या आहेत. व्यवसायात फसवणूक झालेल्या स्पर्धकांनी या मंचावर त्यांची आपबित्ती सांगितल्यावर तुम्हाला गहिवरुन आल्याशिवाय राहणार नाही.

शार्क टँक इंडियामध्ये एका स्पर्धकाने सांगितलेली आपबित्ती तुम्हाला स्तब्ध करणारी आहे. या शोमध्ये स्पर्धकाने त्याची कशी फसवणूक झाली, याची माहिती दिली. त्याने सांगितले की, 2014 साली मित्रांसह कंटेंट कंपनी उघडली. जोमात काम सुरु झाले. त्याचे फायदे दिसू लागले.

हे सुद्धा वाचा

सर्वांच्या मेहनतीला यश आले. या कंपनीचा वार्षिक महसूल 40 कोटींच्या घरात पोहचला. या कंपनीने भूतो न भविष्यती प्रगती केली. एका दिवशी स्पर्धकासह भागीदारांची बैठक झाली. पण दुसऱ्या दिवशी संपूर्ण कंपनीच रातोरात गायब झाल्याचे समजले. हा मोठा धक्का होता.

रात्रंदिवस मेहनत करुन उभारलेली कंपनी अशी अचानक गायब झाल्याने स्पर्धकाला धक्का बसला. शार्क टँकच्या मंचावर ही आपबित्ती सांगताना स्पर्धकाला रडू कोसळले. त्याला अश्रू अनावर झाले. अश्रू पुसत पुसतच त्याने हा धक्कादायक प्रकार कथन केला. पण पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी तो या मंचावर आला.

या स्पर्धकाच्या कंपनीचे नाव Stage असे आहे. शार्क टँक इंडियाकडून त्यांना मदतीची आशा आहे. त्यांना मोठा निधी हवा आहे. Stage हा भारतातील विविध बोली भाषांसाठीचा ओटीटी प्लॅटफार्म आहे. या प्लॅटफॉर्ममुळे हरियाणातील 1000 कलाकारांना काम मिळाले.

हा शोवर प्रेक्षकांची नाराजी दिसून येत आहे. समाज माध्यमांवर युझर्सने या शोवर टीका केली आहे. या शोमधील तू-तू-मै-मैं मुळे हा शो सासू-सूनेचा ड्रामा शो असल्याची टीका प्रेक्षक करत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.