Scrapping: भंगारमध्ये कशाला देता राव, राज्य सरकारने वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी आणली की..
Scrapping: वाहनांसाठी राज्य सरकारने स्क्रॅपिंग पॉलिसी आणली आहे..जाणून घ्या तुम्हाला काय होईल फायदा..
मुंबई : राज्य सरकारने वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी (Scrapping) खास पॉलिसी (Policy) आणली आहे. त्यामुळे तुमचे वाहन जूनं झालं असेल तर नाहक त्याचा मेन्टेन्स (Maintenance) कशाला सहन करता. स्क्रॅपिंग पॉलिसीतंर्गत तुम्हाला लाभ आणि सवलत एकाच वेळी मिळणार आहे. राज्य सरकारने स्क्रॅपिंगची पॉलिसी जाहीर केली आहे.
गुरुवारी झालेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. वाहन स्क्रपिंग पॉलिसीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. स्क्रॅपिंग धोरण हे पूर्णतः ऐच्छिक आहे. पण त्याचे फायदे अनेक आहे. तुम्हाला कर सवलतीसोबतच व्याज माफीही मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणे फायदेशीर ठरू शकते.
स्क्रॅपिंग होत असलेल्या वाहनांचा थकित वाहन करावरील व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एवढंच नाही तर पर्यावरण कर आणि त्यावरील व्याजही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा जून्या वाहनधारकांना घेता येईल.
महाराष्ट्रात वाहनांच्या ऐच्छिक ‘स्क्रॅपिंग’साठी धोरणात्मक निर्णय#मंत्रिमंडळनिर्णय #MaharashtraCabinet pic.twitter.com/4zmfAXGHk7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 20, 2022
थकीत कराच्या वसुलीसाठी लिलाव करण्यात येत असेल आणि ही रक्कम लिलावाच्या मूळ करापेक्षा अधिक असल्यास थकित कर वसूल करण्यात येईल आणि उर्वरित रक्कम मालकाला परत करण्यात येणार आहे. हा निर्णय तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.
ही लिलाव प्रक्रिया शासनाचे सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध उपक्रम यांना करता येईल. बेवारस वाहनांचा लिलाव नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधेमार्फतच करण्याचे सरकारने बंधन घातले आहे. स्क्रॅपिंग सुविधेमार्फतच सरकारी यंत्रणेला हे धोरण राबविता येणार आहे.
8 वर्षांच्या आत वाहन स्क्रॅप केल्यास वार्षिक करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 15 वर्षांच्या आत वाहन स्क्रॅप केल्यास वाहनाच्या एकरक्कमी करात 10 टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.