Share Return : 2.25 रुपयांच्या शेअरने केली कमाल, गुंतवणूकदार मालामाल, 7 वर्षात दिला 87 पट परतावा

Share Return : या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना लखपती केले आहे.

Share Return : 2.25 रुपयांच्या शेअरने केली कमाल, गुंतवणूकदार मालामाल, 7 वर्षात दिला 87 पट परतावा
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 10:10 PM

नवी दिल्ली : या पेनी शेअरने (Penny Share) गुंतवणूकदारांना सातच वर्षांत अनेक पटींचा फायदा करुन दिला. या शेअरने गुंतवणूकदारांना (Investors) लखपती केले आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अल्प काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा जास्त परतावा मिळतो. कारण सूचीबद्ध कंपन्या त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अनेक लाभ देतात. बोनस, शेअर बोनस (Share Bonus), लाभांश (Dividend), बायबॅक या सारखे फायदे मिळतात. या कंपनीने पण स्टॉकहोल्डर्सला मोठा फायदा मिळवून दिला. 7 वर्षांतच या कंपनीने शेअरधारकांना लखपती केले आहे.

आरबी डेनिम (RB Denims Share Price) या शेअरची किंमत सात वर्षांपूर्वी अवघी 2.25 रुपये होती. पण या सात वर्षांत या कंपनीने जोरदार घोडदौड केली. आज हा शेअर 39 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरमध्ये 1600 टक्क्यांचा फायदा दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या शेअरने दूरचा पल्लाच गाठला नाही तर या प्रवासात गुंतवणूकदारांनाही फायदा मिळवून दिला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये स्टॉक स्प्लिटचा फायदा मिळाला. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या सात वर्षांत कंपनीने 87 पट परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

आरबी डेनिमने 28 ऑक्टोबर 2021 रोजी 1:5 प्रमाणानुसार स्टॉक स्प्लिट केला होता. याचा अर्थ शेअरधारकांना या कंपनीने एका शेअरच्या प्रमाणात पाच शेअर दिले होते. या कंपनीने 2 रुपये प्रति इक्विटी शेअरचा लाभांशही दिला होता.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने जानेवारी 2016 मध्ये या कंपनीचा शेअर खरेदी केला असता तर त्याला अवघ्या 2.25 रुपये प्रति शेअरने तो मिळाला असता. कंपनीने पुढे स्टॉक स्प्लिट केल्याने त्याला एका शेअरच्या प्रमाणात 5 शेअर मिळाले असते. त्याचा आणखी फायदा झाला असता.

सात वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला 44,444 शेअर मिळाले असते. 1:5 स्टॉक स्प्लिटमुळे 2,22,220 शेअर्स झाले असते. BSE वर या शेअरची किंमत 39 रुपये आहे. गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये आज जवळपास 87 लाख रुपये झाले असते.

या स्टॉकचा 52- आठवड्यातील उच्चांक 92.45 रुपये होता. तर 52- आठवड्यातील निच्चांकी किंमत केवळ 38.10 रुपये होता. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 272 कोटी रुपये आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.