एका ट्वीटने रावाचा रंक झाला, 18,000 कोटीच्या कंपनीला केवळ 74 रुपयांत विकावे लागले
साल 2003 मध्ये बीआर शेट्टी यांनी फार्मास्युटिकल कंपनी एनएमसी नियोफार्मा कंपनी सुरु केली. बीआर शेट्टी याचं नाव काही वर्षांत दुबईसह जगातील श्रीमंत लोकांमध्ये घेतले जाऊ लागले. शेट्टी यांनी जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलीफात 25 मिलीयन डॉलरमध्ये दोन माळे विकत घेतले. शेट्टी आपल्या शानदार पार्टीसाठी ओळखले जाऊ लागले. त्यांच्याकडे दुबईतील अनेक व्हीला, रोल्स रॉयस् आणि मेबॅक सारख्या लक्झरी कार आणि प्रायव्हेट जेट देखील होते.
नवी दिल्ली | 4 फेब्रुवारी 2024 : जगात कोणाचं नशीब बदलण्यास वेळ लागत नाही. कोणाला कधी छप्पर फाड कमाई होईल तर कोणाचा बेडा कधी पार होईल हे काही सांगता येत नाही. असे एका भारतीय वंशाच्या अब्जाधीशाबाबत घडले होते. युएईत रहाणारे मुळचे भारतीय उद्योजक बवागुथु रघुराम शेट्टी यांच्या नशीबाने एकदा असाच धक्का दिला. साल 1973 मध्ये घरातून केवळ 665 रुपये घेऊन निघालेले बी.आर. शेट्टी अल्पावधीतच अब्जाधीश बनले. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका गावात जन्मलेले बी.आर. शेट्टी यांचे नाव साल 2019 च्या श्रीमंत उद्योगपतींच्या फोर्ब्जच्या यादीत झळकलं होतं. साल 2009 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. परंतु एका ट्वीटमुळे ते रावाचे रंक झाले.
बी.आर. शेट्टी साल 1973 मध्ये युएईला गेले. त्यांच्याजवळ केवळ 365 रुपये होते. तेथे त्यांनी मेडीकल रिप्रझेंटेटिव्हची नोकरी केली. त्यांनी प्रचंड मेहनत करीत आपले हॉस्पिटल उभारले. त्यांचे हॉस्पिटल त्यांची डॉक्टर पत्नी सांभाळत होती. त्यानंतर त्यांनी एनएमसी हेल्थ नावाने कंपनी स्थापन केली. पहाता…पहाता ही कंपनी युएईची सर्वात मोठी हेल्थ कंपनी बनली. जी युएईसह अनेक देशातील हॉस्पिटलचे संचलन करीत होती. ही कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये लीस्टींग झाली. 1980 मध्ये शेट्टी यांनी युएई एक्सचेंज नावाच्या कंपनीचे अधिग्रहन केले. ही कंपनी युएईत काम करणाऱ्या बाहेरी देशातील नागरिकांना त्यांच्या देशात पैसे सहज पाठविण्यासाठी मदत करायची. साल 2016 मध्ये युएई एक्सचेंज कंपनीची 31 देशात 800 कार्यालये होती.
एका ट्वीटने लावली वाट
साल 2019 मध्ये युके मधील एक फर्म मड्डी वार्टर्सने एक ट्वीट केले. त्याने त्यांची दिवाळखोरी झाली. मड्डी वॉटर्सला करसन ब्लॉक नामक एक शॉर्ट सेलर चालवित होता. या शॉर्ट सेलर कंपनीने ट्वीटनंतर बीआर शेट्टी यांच्या कंपनीवर एक अहवाल प्रसिध्द केला. यात कंपनीवर 1 अब्ज डॉलरचे कर्ज असून शेट्टी यांनी ते लपविल्याचे म्हटले. त्यानंतर NMC चे हेल्थ खूप खराब झाली. फेब्रुवारी 2020 मध्ये शेट्टी यांना कंपनीच्या संचालक पदावरुन दूर केले. शेअर कोसळले. कधी काळी 18,000 कोटी मार्केट कॅपच्या या कंपनीला इस्रायल आणि युएई बेस्ड कंपनीला केवळ एका डॉलरमध्ये विकण्यात आले. ज्यावेळी ही कंपनी विकली गेली तेव्हा एका डॉलरची किंमत 74 रुपये होती. 8 एप्रिल 2020 रोजी कंपनीला दिवाळखोर जाहीर केले.