परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या छोट्या लवलीसाठी गौतम अदानी ठरले देवदूत; अशी मदत करणार
Gautam Adani Help : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील एका छोट्या मुलीच्या आयुष्यात गौतम अदानी हे देवदूत ठरले आहे. या मुलीची संघर्षगाथा अनेकांचे हृदय हेलवणारी आहे. तिचे हे दुःख अदानी यांना पण पहावले नाही, त्यांनी लागलीच तिला मदत दिली आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील एका लहान मुलीसाठी दिग्गज उद्योगपती गौतम अदानी हे धावून आले आहेत. या मुलीचा लहानपणापासूनच संघर्ष सुरु आहे. तिची आई लहानपणीच वारली. तिच्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. या मुलीला तिच्या आईच्या आई-वडिलांकडे पाठविण्यात आले. गरिब परिस्थितीत ती जीवन जगत होती. तिचे शिक्षण सुरु होते. पण तिच्यावर अजून एक संकट कोसळले. तिचा डावा पाय आणि हात अचानक वाकडे झाले. तिच्यावर उपचाराचा खर्च करण्यासाठी सुद्धा आजी-आजोबांकडे पैसा नाही. तिच्या या व्यथेने गौतम अदानी यांचे हृदय द्रवले. त्यांनी तिला मदतीचा हात पुढे केला आहे. लखीमपूर खिरीजवळील कंधरापूर येथील या मुलीचे नाव लवली असे आहे.
अदानी यांचे हृदय द्रवले
सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरु आहेत. या दरम्यान देशातील अनेक भागातील संघर्षगाथा आणि अनेकांच्या समस्या समोर येत आहे. त्यामाध्यमातून अनेक वार्ता समोर येत आहे. एका रिपोर्टरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लवलीची संघर्ष कथा सांगितली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कोण ऐकणार दुख लहानपणीचे’ या हॅशटॅगखाली ती व्हायरल झाली. ते पाहून गौतम अदानी यांचे हृदय द्रवले.
अदानी फाऊंडेशन करणार उपचार
इयत्ता 5 वीत शिकणारी लवलीचे दुःख, गौतम अदानी यांना समजून घेतले. त्यांनी एक्सवर याविषयीची एक पोस्ट पण शेअर केली. “एका मुलीचे लहानपण अशा प्रकारे दुखाने भरुन जाणे दुखदायक आहे. छोट्या वयात लवली आणि तिच्या आजी-आजोबांची संघर्षकथा समोर आली आहे. त्यातून एक सर्वसामान्य भारतीय कुटुंब कधीच हार मानत नसल्याचे दिसून येते. अदानी फाऊंडेशन निश्चितपणे लवलीवर उपचार करेले आणि ती इतर मुलांसोबत पुढे जाईल. आम्ही सर्व लवली सोबत आहोत.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
एक बेटी का बचपन यूं छिन जाना दुखद है!
छोटी सी उम्र में लवली और उसके दादा-दादी का संघर्ष बताता है कि एक आम भारतीय परिवार कभी हार नहीं मानता।@AdaniFoundation यह सुनिश्चित करेगा की लवली को बेहतर इलाज मिले और वो भी बाकी बच्चों के साथ कदम से कदम मिलाकर आगे बढ़ सके।
हम सब लवली के… https://t.co/0Zes20UOSu pic.twitter.com/StVhUrk7SU
— Gautam Adani (@gautam_adani) May 17, 2024
गौतम अदानी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियवर अनेक युझर्सने त्यांच्या कामाला सलाम केला आहे. गौतम अदानी यांचा अदानी समूह, अदानी फाऊंडेशन चालवितो. हे फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य आणि इतर अनेक क्षेत्रात काम करते. गौतम अदानी यांची पत्नी प्रिती अदानी यांनी 1996 मध्ये अदानी फाऊंडेशनची सुरुवात केली होती. हे फाऊंडेशन 73 लाख लोकांसाठी काम करते. या फाऊंडेशनचे काम देशातील 19 राज्यांमधील 5,753 गावात सुरु आहे. प्रिती अदानी या लग्नापूर्वी व्यवसायाने डॉक्टर होत्या.