एकाच दिवसात 2,90,00,000 रुपयांची कमाई! या गुंतवणूकदाराला पुन्हा लागली लॉटरी

Multibagger Stock | या स्टॉकने एकाच दिवसात या गुंतवणूकदाराला मालामाल केले. पण लाख, 10 लाख, 50 लाख नाही, तर 2,90,00,000 रुपयांची कमाई करुन दिली. या शेअरमधील गुंतवणूक त्याला एकदम फायदेशीर ठरली. त्याची स्ट्रॅटर्जी कामी आली. यापूर्वी पण या गुंतवणूकदाराने अनेकदा मोठी कमाई केली आहे.

एकाच दिवसात 2,90,00,000 रुपयांची कमाई! या गुंतवणूकदाराला पुन्हा लागली लॉटरी
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 10:05 AM

नवी दिल्ली | 1 नोव्हेंबर 2023 : तर शेअर बाजारात अजूनही तेजी परतण्याची सर्वच जण प्रयत्न करत आहेत. पण प्रत्येकाला पैसा पण कमावायचा आहे. बाजारात सध्या प्रचंड उलथापालथ सुरु आहे. सणासुदीत बाजार पडत असल्याने किरकोळ गुंतवणूकदार धास्तावले आहेत. कमाईचा मुहूर्त साधण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. नफा ओढण्यासाठी मोठे गुंतवणूकदार खेळी करत आहेत. दरम्यान या बड्या गुंतवणूकदाराने पुन्हा एकदा करिष्मा करुन दाखवला. या कंपनीतील गुंतवणूक त्याला फायदेशीर ठरली. त्याने एकाच दिवशी 2 कोटी 90 लाख रुपयांची कमाई केली. यापूर्वी पण या गुंतवणूकदाराला अनेकदा लॉटरी लागली आहे.

आशिष कचोलिया यांना लॉटरी

दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची स्ट्रॅटर्जी पुन्हा एकदा कामी आली. त्यांनी या कंपनीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरली. या कंपनीचा शेअर मंगळवारी 10 टक्क्यांनी वधारला. आशिष कचोलिया यांच्याकडे या कंपनीत 1.86 टक्के शेअर आहेत. गेल्या 6 महिन्यात हा शेअर जवळपास 45 टक्क्यांनी वधारला आहे. पण आशिष कचोलिया यांना या स्टॉकने एकाच दिवसात 2 कोटी 90 लाख रुपयांची कमाई करुन दिली आहे.

हे सुद्धा वाचा

एकाच दिवसात मालामाल

तर NIIT Limited ही सर्वांच्या परिचयाची कंपनी आहे. या कंपनीत कचोलिया यांनी गुंतवणूक केलेली आहे. कंपनीचे एकूण 25,00,000 इतके शेअर आहेत. 31 ऑक्टोबर रोजी प्रत्येक शेअर 11.60 रुपयांनी वधारला. कचोलिया यांच्याकडील शेअरशी त्याचा गुणाकार केला तर एकाच दिवसात त्यांना 2 कोटी 90 लाख रुपयांचा फायदा झाल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षात एनआयआयटीने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. तीन वर्षात या कंपनीने 250 टक्के परतावा दिला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी, गुंतवणूकदार संस्थांनी त्यांचा या कंपनीतील हिस्सा वाढवला आहे. त्यांनी अधिक शेअरची खरेदी केली आहे.

कंपनीचा तिमाही निकाल

कंपनीच्या महसूलात घट झाली असली तरी नफ्यात मात्र वाढ झाल्याचे दिसून येते. वार्षिक आधारावर चालू आर्थिक वर्षात महसूल 81.41 कोटी आहे. त्यात वार्षिक आधारावर 13.44 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. तर नफ्याचे गणित कंपनीने जमवले आहे. कंपनीच्या नफ्यात 53.42 टक्क्यांची वाढ झाली आहे. यावेळी नफा 16.23 टक्क्यांवर पोहचला. गेल्यावेळी नफ्याचा आकडा 10.72 कोटी रुपये होता. आयटी क्षेत्रातील ही कंपनी 1981 मध्ये स्थापन करण्यात आली होती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.