Gold Silver Rate Today : मोक्यावर मारा चौका! इतके कमी झाले सोने-चांदीचे भाव

Gold Silver Rate Today : तज्ज्ञांच्या मते, स्वस्तात सोने-चांदी खरेदीसाठी सध्या सर्वात चांगली संधी आहे. आज काय आहेत भाव माहिती आहेत का

Gold Silver Rate Today : मोक्यावर मारा चौका! इतके कमी झाले सोने-चांदीचे भाव
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 9:20 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीत खरेदीसाठी सध्या चांगली संधी असल्याचे मत, तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोन्याचे भाव घसरले आहेत. सोने स्वस्त होऊन 60000 प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. 3 जून रोजी तर 770 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण होऊन सोने 60,480 रुपयांवर येऊन ठेपले होते. 22 कॅरेट सोने तर 55,450 रुपयांवर आले. चांदी 71,462 रुपये किलोवर आली आहे. डॉलरच्या जबरदस्त खेळीमुळे भावावर परिणाम दिसून येत आहे. 2 जून रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. तर चांदीने पण दरवाढीचे खाते उघडले. किलोमागे चांदी 600 रुपयांनी वधारली. 31 मे रोजी आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीने भाव (Gold Silver Price) वाढ नोंदवली होती. आज 6 जून रोजी सकाळच्या सत्रात भाव जाणून घेऊयात..

सराफा बाजाराची खबरबात सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला सोने 707 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने स्वस्त होऊन 59601 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचले होते. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने 151 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून 60308 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. सोमवारी सोने स्वस्त झाले. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. चांदीत 90 रुपयांची वाढ होऊन भाव 71462 रुपये प्रति किलो वर बंद झाले.

भावात अशी वाढ goodreturns च्या आकडेवारीनुसार, 31 मे आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदी वधारली होती. तर 1 जून रोजी संध्याकाळच्या सत्रात चांदीत 150 रुपयांची घसरण झाली होती. 2 जून रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ झाली. आज 3 जून रोजी सकाळच्या सत्रात भावात 10 रुपयांची वाढ झाली. आता संध्याकाळपर्यंत दोन्ही धातूत काय बदल होतो, हे स्पष्ट होईल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 56,160 रुपये तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 61,260 रुपये झाले. 5 जून रोजी 22 कॅरेटचा भाव 55,450 रुपयांवर तर 24 कॅरेटचा भाव 60,480 रुपयांवर आला. 6 जूनचा सकाळच्या सत्रातील भाव अपडेट झाला नाही.

हे सुद्धा वाचा

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,601 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 59,362 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 54,595 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 44,701 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.