Bank Holiday : मार्च महिन्यात इतके दिवस बँकेला ताळे, तुमचे काम पटापट करुन घ्या

Bank Holiday : मार्च महिन्यात सण, उत्सव आणि सुट्यांमुळे बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे या महिन्यात पटकन कामे उरकून घ्या. नाहीतर तुमचे काम अनेक दिवस अडकून पडेल.

Bank Holiday : मार्च महिन्यात इतके दिवस बँकेला ताळे, तुमचे काम पटापट करुन घ्या
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 9:14 PM

नवी दिल्ली : यावर्षातील दुसरा महिना, फेब्रुवारी (February) आता अवघ्या दोन दिवसांनी संपेल. मार्च महिना लागलीच येऊन धडकेल. मार्च महिन्यात सण, उत्सवाची सुरुवात होत आहे. भारतीय परंपरानुसार, मराठी महिन्यानुसार सण, उत्सव या महिन्यात येतात. मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँकांना सुट्टी (Bank Holiday) आहे. या तिसऱ्या महिन्यात बँकांचे कामकाज 12 दिवस बंद राहतील. मार्च महिन्यात होळी हा मोठा सण येतो. हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. याकाळात बँक बंद राहील. मार्च, 2023 मध्ये चैत्र नवरात्र, गुढीपाडवा, रामनवमी हे पण सण आहेत. तसेच रविवार आणि शनिवारची सुट्टी असेल. पुढील महिन्यात 3, 5, 7, 8, 9, 11, 12, 19, 22, 25, 26 आणि 30 मार्च रोजी निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी बँका बंद राहितील. त्यामुळे ग्राहकांना वेळतच बँकेसंबंधीची कामे उरकून घेणे महत्वाचे आहे.

पण संपूर्ण भारतात एकाच दिवशी सगळ्याच बँका बंद राहतील असे नाही. काही भागात सुट्टी असली तरी इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु राहिल. त्यामळे बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घ्या. RBI द्वारे बँकांना सुट्टी जाहीर करण्यात येते. पण सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. काही राज्यातच बँका बंद असतात. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते.

बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील. तर क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

हे सुद्धा वाचा

मार्च 2023 महिन्यात या दिवशी बँका राहतील बंद

05 मार्च, 2023- रविवार सुट्टी 07 मार्च, 2023- होळी, होलिका दहन 08 मार्च, 2023- होळी, धुळवड 09 मार्च, 2023- बिहारमधील पाटना येथे होळीनिमित्त बंद राहील 11 मार्च, 2023- दुसरा शनिवारी, सुट्टी 12 मार्च, 2023- रविवार सुट्टी 19 मार्च, 2023- रविवार सुट्टी 22 मार्च, 2023- गुढी पाडवा, तेलगू नवीनवर्ष 25 मार्च, 2023- मार्च महिन्यातील चौथा शनिवार 26 मार्च, 2023- रविवार सुट्टी 30 मार्च, 2023- रामनवमी

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.