Share Market | दसऱ्याला शेअर बाजारात होईल का ट्रेडिंग? या दिवशी तर सुट्टीचा मुहूर्त
Share Market | देशात आज दसऱ्याचा मोठा उत्साह आहे. विजयादशमीनिमित्त आज अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंगचा मुहूर्त साधण्याचा विचार करत आहे. सणानिमित्त शेअर बाजार बंद असेल की सुरु असेल, वायदे बाजारात ट्रेडिंग होईल की नाही, काही गुंतवणूकदारांना आज विशेष ट्रेडिंगचा मुहूर्त आहे का? जाणून घ्या..
नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : देशभरात आज दसऱ्याचा उत्साह आहे. भारतीय शेअर बाजार सातत्याने सीमोल्लंघन करत आला आहे. कोरोना नंतर स्टॉक मार्केट पुन्हा सीमोल्लंघन करुन नवीन रेकॉर्ड करेल, अशी अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांची आशा आहे. देशात सणासुदीची रेलचेल सुरु झाली आहे. दिवाळीपर्यंत खरेदीची लगबग राहिल. सध्या देशभर आनंदाचे वातावरण आहे. पण आज विजयादशमीनिमित्त अनेक गुंतवणूकदारांना बाजारात ट्रेडिंगचा मुहूर्त गाठायचा आहे. पण आज बाजाराला सुट्टी असते की दसऱ्यानिमित्त बाजात विशेष ट्रेडिंग सेशन असणार आहे? याविषयी गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम आहे.
दूर करा संभ्रम
दसऱ्याच्या दिवशी शेअर बाजारात कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. आज शेअर बाजारात दिवाळीत होते तसे खास ट्रेडिंग होणार नाही. मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन्ही बाजारांना मंगळवारी, 24 ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही बीएसईच्या साईटवर ‘Trading Holidays’ या विभागात ही माहिती तपासू शकता. गुंतवणूकदारांना उद्या, बुधवारी शेअर बाजारात ट्रेडिंग करता येईल. या आठवड्यात तीन दिवस ट्रेडिंग होईल.
वायदे बाजारात होणार व्यापार
दसऱ्याच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात करन्सी मार्केटमध्ये व्यापार होणार नाही. डेरिवेटिव्ह सेगमेंटमधील व्यवहार पण ठप्प असतील. पण वायदे बाजारात ट्रेडिंग करता येईल. मंगळवारी MCX आणि NCDEX वर व्यापार करता येईल. पण हे सत्र संध्याकाळी असेल. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाजार बंद असेल. पण संध्याकाळी 5 वाजता बाजार सुरु असेल. सोने-चांदीपासून ते कच्चे तेल आणि इतर धातूत ट्रेडिंग होईल.
शेअर बाजार या दिवशी ठप्प
26 जानेवारी, प्रजासत्ताक दिवस , 7 मार्च, होळी, 30 मार्च, राम नवमी, 4 एप्रिल, महावीर जयंती, 7 एप्रिल, गुड फ्राईडे, 14 एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे, महाराष्ट्र दिवस, 29 जून, बकरी ईद, 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन, 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती या सुट्यांच्या दिवशी बाजार बंद होता.
या दिवशी कामकाज नाही
- 24 ऑक्टोबर, दसरा
- 14 नोव्हेंबर, दिवळी, बळी प्रतिपदा
- 27 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती
- 25 डिसेंबर, नाताळ, ख्रिसमस