या 10 भारतीय कंपन्यांनी रचला इतिहास! त्यांच्यापेक्षा कमी आहे शेजारील देशांची अर्थव्यवस्था
Most Valued Company | भारताची सर्वात मौल्यवान कंपनी, Mukesh Ambani यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 19.82 लाख कोटी रुपये आहे. हा महसूली आकडा श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान या छोट्या राष्ट्रांपेक्षा जास्त आहे. टाटा समूहातील एका कंपनीचे मार्केट कॅप पाकिस्तान जीडीपीपेक्षा अधिक आहे.
नवी दिल्ली | 20 February 2024 : भारताची अर्थव्यवस्था सध्या तेजीवर स्वार आहे. जागितक बँकेपासून ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह इतर अनेक जागतिक पतमानांकन संस्थांनी भारतावर विश्वास वर्तवला आहे. यादरम्यान देशातील टॉप-10 कंपन्यांनी पण कमाल केली आहे. याविषयीचा अंदाज वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2023 रिपोर्ट पाहिल्यानंतर दिसून येईल. या अहवालानुसार, या कंपन्यांचे एकूण बाजारातील भांडवल, दक्षिण आशियातील देशांच्या एकूण जीडीपीपेक्षा पण अधिक आहे. यामध्ये पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि भूतान या देशांचा समावेश आहे.
टॉप-10 कंपन्यांचे मार्केट कॅप इतके
IMF च्या रिपोर्टनुसार, भारतातील 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांचे मार्केट कॅप, 6 दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांपेक्षा जीडीपी अधिक आहे. यामध्ये पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि भूतान या छोट्या राष्ट्रांचा समावेश आहे. भारताच्या टॉप-10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टेंशी सर्व्हिसेज लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. या दहा कंपन्यांचे बाजारातील भांडवल 1.084 ट्रिलियन डॉलर आहे. तर दक्षिण आशियातील वार्षिक जीडीपी 912 अब्ज डॉलर आहे.
GDP विषयी IMF चा अंदाज
जागतिक नाणेनिधीने वर्ल्ड आंतरराष्ट्रीय फोरम 2023 चा अहवालात या सहा देशांच्या जीडीपीबाबत अंदाज जाहीर करण्यात आला आहे. बांगलादेशचा 2023 चा जीडीपी 446 अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे. सध्या पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. या देशाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. या देशाचा जीडीपीचा अंदाज 340.63 अब्ज डॉलर आहे. तर श्रीलंकेचा 2022 मधील अंदाजानुसार, 74.84 बिलियन डॉलर होता. नेपाळचा जीडीपी 41.339 अब्ज डॉलर, मालदीवचा जीडीपी 6.97 अब्ज डॉलर तर भूतानचा जीडीपी 2.68 अब्ज डॉलरचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
रिलायन्स चार देशांपेक्षा वरचढ
भारताची सर्वात मौल्यवान कंपनी मुकेश अंबानी यांच्या नेतृवाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारातील भांडवल 19.82 लाख कोटी रुपये आहे. हा आकडा श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. तर 719 अब्ज डॉलर मूल्य असलेल्या टॉप-5 कंपन्या जवळपास दक्षिण आशियातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था बांगलादेश आणि पाकिस्तानच्या समान आहे.