Best Scheme : लाडक्या लेकीसाठी या आहेत सर्वोत्तम सरकारी योजना, शिक्षणच नाही तर लग्नाची ही मिटेल काळजी..
Best Scheme : लाडक्या लेकीसाठी या सर्वोत्तम सरकारी योजना आहेत..
नवी दिल्ली : लाडक्या लेकीसाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना (Sarkari Yojana) राबविते. या योजनांमध्ये मुलींच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेवर जास्त भर देण्यात आला आहे. या सरकारी योजनांमध्ये अनेक लाभ देण्यात येतात. त्यामुळे मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत (Marriage) सर्व खर्चासाठी पालकाला रक्कम मिळते. पालकांनी केलेल्या गुंतवणुकीतून जोरदार परतावा मिळतो. त्यामुळे पालकांना लग्नाच्यावेळी आणि शिक्षणासाठी मोठी रक्कम उभी करता येते. आर्थिक विंवेचनेतून (Financial Problem) पालकांला मोठा दिलासा मिळतो.
या पाच सरकारी योजनांमधून मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाच्या खर्चासाठीची तरतूद करण्यात येते. त्यानुसार, एक निश्चित रक्कम दरमहा गुंतविल्यास भविष्यातील मोठ्या आर्थिक खर्चाची तरतूद करता येते. या योजनांमधून सरकार मोठी आर्थिक तरतूद, मदत करते.
सुकन्या समृद्धी योजना ही अल्पबचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षापर्यंच्या मुलीच्या नावे गुंतवणूक करता येते. केंद्र सरकार या योजनेवर सध्या 7.6 टक्के व्याज देते.
सुकन्या समृद्धी योजनेत कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक भविष्यातील मोठ्या आर्थिक खर्चाची तरतूद ठरते.
सुकन्या समृद्धी योजनेसारखीच बालिका समृद्धी योजना आहे. या योजनेसाठी टपाल कार्यालयात खाते उघडता येते. यामध्ये 500 रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत केंद्र सरकार वार्षिक व्याज देते. योजनेतंर्गत मुलीच्या वयाच्या 18 वर्षी रक्कम काढता येते.
मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत CBSE उडान योजना राबविण्यात येते. या योजनेत मुलींसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. योजनेतंर्गत अभ्यास सामग्रीसह प्रीलोडेड टॅब्लेट देण्यात येतो. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी पूर्ण करुन घेण्यात येते.
महाराष्ट्र सरकार कन्या भाग्यश्री योजना राबविते. या योजनेतंर्गत राष्ट्रीयकृत बँकेत मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडण्यात येते. योजनेत एक लाखापर्यंतचा अपघात विमा आणि 5000 रुपयांची ओव्हर ड्राफ्ट सुविधा देण्यात येते.