2000 Note : 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याचे असे ही फायदे, वाचाल तर दंग व्हाल

2000 Note : भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याचे निर्देश दिले. 23 मे पासून या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्याचे आता अनेक फायदे दिसून येत आहेत.

2000 Note : 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याचे असे ही फायदे, वाचाल तर दंग व्हाल
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 3:19 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या (2000 Currency Note) नोटा माघारी बोलविण्याचे निर्देश दिले. 23 मे पासून या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली. अर्थात दोन हजारांच्या गुलाबी नोटा एका वर्षांपासून बाजारातून गायब झाल्या होत्या. एकतर त्यांची छपाई थांबविण्यात आली होती. तर दुसरीकडे अनेकांना या नोटा दडवून ठेवल्या तर काहींनी साठेबाजी केली होती. या नोटांमधून पुन्हा काळ्या पैशांचा धोका वाढू नये, यासाठी तातडीने हा उपाय करण्यात आला. पण एवढाच याचा फायदा नाही. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी बँक, भारतीय स्टेट बँकेने (State Bank Of India) या नोटा माघारी बोलविण्याचे फायदे कथन केले आहे. काय आहेत हे फायदे?

कर्जाचा परतावा झपाट्याने एसबीआयच्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार, बँकांमध्ये 2000 रुपयांच्या 1.5 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. त्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणावर नोटा जमा झाल्या आणि काहींनी मोठ्या प्रमाणावर कर्जाची परतफेड केली आहे. काहींनी मुद्दलमध्ये पैसा जमा केला आहे. याशिवाय डिजिटल करन्सीमुळे जीडीपी वधारण्याची शक्यता आहे. एसबीआयने आपल्या अहवालात दावा केला आहे की, नोटा परत घेतल्याने बँकांमधील ठेव योजनेत मोठ्या रक्कमा जमा होत आहेत. क्रेडिट रेशो डिपॉझिटमध्ये वाढ झाली असून ती कोविड पूर्व काळाच्या समांतर पातळीवर पोहचली आहे. बँकांच्या विविध लोन सेक्टरसाठी त्याचा फायदा होत आहे.

कर्ज वाटपासाठी संधी परदेशी बाजाराची अस्थिरता, जागतिक बाजारातील घडामोडी पाहता देशातील कंपन्यांना कर्ज पुरवठा करण्याची बँकांची स्थिती सुधारली आहे. दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा होत असल्याने कर्ज वाटपाची मोठी संधी बँकांना मिळाली आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात एक रक्कमी दोन हजारांच्या नोटा जमा करत आहेत. त्यामुळे बँकांचा चलन पुरवठा सुधारला आहे. 8 जून रोजी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दोन हजारांच्या जवळपास 1.8 लाख कोटी रुपये पुन्हा बँकिंग सिस्टिममध्ये परत आल्याचे सांगितले. 23 मार्चपर्यंत 3.62 लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या.

हे सुद्धा वाचा

कॅश ऑन डिलिव्हरीत वाढ एसबीआयने आपल्या अहवालात सांगितल्याप्रमाणे, गुलाबी नोटा बँकिंग सिस्टिममध्ये परत बोलाविल्याने बँकांना फायदा झाला आहे. एवढेच नाही तर कॅश ऑन डिलिव्हरी पण वाढली आहे. फुड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या असोत वा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, यांचा रोखीतील व्यवहार वाढला आहे. सध्या काळात जवळपास 75 टक्के व्यवहार हे रोखीत होत असल्याचे या अभ्यास अहवालात समोर आले आहे. अचानकच दोन हजार नोटांचा पाऊस चलन व्यवस्थेत पडला आहे.

2000 रुपयांची नोट व्यवहारात वापरता येईल? RBI ने स्पष्ट केल्यानुसार, नागरिकांना ही नोट व्यवहारात, खरेदी-विक्रीसाठी वापरता येईल. तिचे सार्वजनिक व्यवहारातील महत्व अजूनही अबाधित आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपूर्वी 2000 रुपयांची खात्यात जमा करता येतील.

2000 रुपयांची नोट असेल तर हे करा देशातील नागरिकांना या नोटा खात्यात जमा करता येतील, अथवा त्या बदलवीता येतील. नोट एक्सचेंज करण्यासाठी ही सुविधा 30 सप्टेंबरपर्यंत असेल. सार्वजनिक बँका, व्यावसायिक माध्यम केंद्र आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयात या नोटा बदलविता येतील.

एका दिवशी इतक्या नोटा बदला आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

Non Stop LIVE Update
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.