हे स्टॉक घडवून आणतील लक्ष्मी दर्शन! तुम्ही आजमावणार का नशीब

Diwali Muhurat Trading | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना “दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग” मध्ये कमाईची संधी आहे. पण शेअर बाजारात फायदा मिळवायचा असेल तर डोळे झाकून ट्रेडिंग करुन चालणार नाही. आतापासूनच तुम्ही उद्याच्या ट्रेडिंगसाठी कोणते सेगमेंट चांगले असेल, कोणता स्टॉक धावेल याचा विचार करत असाल तर मुहूर्त ट्रेडिंगमध्ये हे स्टॉक मालामाल करु शकतात.

हे स्टॉक घडवून आणतील लक्ष्मी दर्शन! तुम्ही आजमावणार का नशीब
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 2:27 PM

नवी दिल्ली | 11 नोव्हेंबर 2023 : भारतीय शेअर बाजारात “दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग” महत्वाचे आणि शुभ मानण्यात येते. हे सोने-चांदी खरेदीसारखं आहे. मुहूर्त ट्रेडिंगमधील गुंतवणूक ही लक्ष्मी पूजनादिवशी करण्यात येते. त्यामुळे ती शुभ मानण्यात येते. पण डोळे झाकून उद्या स्टॉक खरेदी केला तर कदाचित तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा 12 नोव्हेंबर, रविवारी दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग होईल. एक तासासाठी हा बाजार उघडेल. त्या काळात गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता येईल. या सत्रात योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. योग्य सेगमेंट आणि शेअरमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये हे स्टॉक तुम्हाला मालामाल करु शकतात.

  1. Ambuja Cement Share – रिलायन्स सिक्युरिटीजनुसार, (Reliance Securities) मुहूर्त ट्रेडिंगमध्ये अंबुजा सिमेंटचा शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करु शकतो. ब्रोकरेज फर्मनुसार, या शेअरसाठी 495 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्याच्या शेअरच्या किंमतीपेक्षा 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळेल.
  2. Hero MotoCorp Share – या ब्रोकरेज फर्मनुसार, मोटोकॉर्पचा शेअर खरेदी करणे फायद्याचे ठरेल. ही कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स सेगमेंटमध्ये जोरदार काम करत आहे. या कंपनीने एथर एनर्जीमध्ये कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 3,620 रुपयांचा टार्गेट ठेवले आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा 14 टक्के रिटर्न मिळेल.
  3. IDFC First Bank Share – आयडीएफसी फर्स्ट बँक एक चांगला ब्रँड आहे. या बँकेची वृद्धी होत आहे. ब्रोकरेजच्या सल्ल्यानुसार या शेअरसाठी 105 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा जवळपास 27 टक्के अधिक रिटर्न मिळेल.
  4. HDFC Bank Share – रिलायन्स सिक्युरिटीजने एचडीएफसी बँकेचे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना जवळपास 19 टक्के परतावा देईल. ब्रोकरेजनुसार बँकेची व्यवसाय वृद्धी होत आहे. रिटेल सेगमेंटमध्ये पण एचडीएफसी मजबूत स्थितीत आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. LTI Mindtree Ltd Share – एलटीआय माईंडट्री कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्मने दिला आहे. या कंपनीच्या क्लाईंटची संख्या सतत वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपनी सातत्याने चांगली कामगिरी बजावत आहे. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन 18 टक्के वाढेल. या शेअरसाठी 5,925 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. हा शेअर 15 टक्के अधिक परतावा देईल.
  7. Happiest Minds Technologies – हॅप्पीएस्ट माईड्स कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज फर्मने दिला आहे. 960 रुपयांचे टार्गेट त्यासाठी देण्यात आले आहे. हा शेअर 16 टक्के फायदा करुन देऊ शकतो.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....