Bonus Share : दुधासोबत दही, ताक आणि मलाई पण! सर्वाधिक बोनस देणाऱ्या या आहेत कंपन्या टॉप-10

Bonus Share : या टॉप-10 कंपन्यांनी आतापर्यंत बोनस शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये काही सरकारी कंपन्या आहेत तर काही खासगी कंपन्या आहेत.

Bonus Share : दुधासोबत दही, ताक आणि मलाई पण! सर्वाधिक बोनस देणाऱ्या या आहेत कंपन्या टॉप-10
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली : बोनस शेअर (Bonus Share) हा कमाईचा मोठा स्त्रोत आहे. शेअर बाजारात एखादी कंपनी तुम्हाला अनेक फायदे मिळवून देते. लाभांश, बोनस शेअर, इतर फायदे जर गुंतवणूकदारांना मिळत असेल तर अशा कंपन्या तुमच्यासाठी दुभत्या गायीपेक्षा कमी नाहीत. गुंतवणूकदारांना (Investors) बोनस शेअर एका खास प्रमाणात मिळतो. जर एखादी कंपनी 3:2 असा बोनस देत असेल तर त्याचा अर्थ प्रत्येक 2 शेअरवर तुम्हाला 3 बोनस शेअर मिळेल. बोनस इश्यू झाल्यावर इक्विटी कॅपिटल वाढते. पण फेस व्हॅल्यूमध्ये (Face Value) कोणताही बदल होत नाही. फेस व्हॅल्यूत बदल न झाल्याने गुंतणूकदारांना भविष्यात लाभांशच्या रुपात त्यांना फायदा होईल.

गुंतवणूकदारांचा रामराम NSE च्या आकड्यानुसार गेल्या 9 महिन्यांत जवळपास 53 लाख गुंतवणूकदारांनी बाजारात काढता पाय घेतला आहे. यामध्ये जागतिक घडामोडींचा मोठा वाटा आहे. भूराजकीय घडामोडी, अमेरिका, युरोपातील वित्तीय आणि बँकिंग संकट, इंधनाचे चढे दर, सोने-चांदीतून मिळणारा मोठा परतावा, रेपो रेटमुळे वाढलेले व्याजदर यामुळे शेअर बाजारातून फार काही हाती येत नसल्याचा नवख्या गुंतवणूकदारांचा समज झाला आहे. त्यामुळे त्यांच्या दृढनिश्चियाला तडा गेला आहे.

या कंपन्यांनी केला फायदा या टॉप-10 कंपन्यांनी आतापर्यंत बोनस शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये काही सरकारी कंपन्या आहेत तर काही खासगी कंपन्या आहेत. बोनस इश्यू झाल्यावर इक्विटी कॅपिटल वाढते. त्याचा लाभ अनेकांना होतो. सीएनबीसी आवाजने याविषयीचा अहवाल तयार केला आहे.

हे सुद्धा वाचा
  1. त्यानुसार, टॉप-6 कंपन्यांच्या यादीत सहाव्या स्थानी सरकारी कंपनी GAIL आणि BPCL ने 5-5 वेळा शेअर वाटप केले आहे.
  2. पाचव्या स्थानावर ब्रिटेनिया ही कंपनी आहे. या एफएमसीजी कंपनीने आतापर्यंत 6 वेळा गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे वाटप केले आहे.
  3. चौथ्या क्रमांकावर फार्मा कंपनी CIPLA, ITC आणि IOC या तीन कंपन्यांनी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 7 वेळा बोनस शेअर इश्यु केले आहे.
  4. या यादीत तिसऱ्या स्थानावर देशातील आयटी कंपनी इन्फोसिस ही आहे. आतापर्यंत कंपनीने 8 वेळा गुंतवणूकदारांना बोनस शेअर दिला आहे.
  5. दुसऱ्या क्रमांकावर L&T आणि संवर्धन मदरसन या कंपन्या आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना 10 वेळा बोनस शेअर दिला आहे.
  6. या यादीत पहिल्या स्थानी विप्रो आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना आतापर्यंत सर्वाधिक बोनस दिला आहे. कंपनीने एकूण 13 वेळा बोनस शेअर दिला आहे. इतक्यावेळा बोनस शेअर वाटप करणारी विप्रो ही एकमेव कंपनी ठरली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.