या बँकांना बसणार आरबीआयच्या नवीन नियमांचा फटका, जाणून घ्या कोणत्या बँका?

नव्या नियमांची 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. आरबीआयच्या नव्या नियमांचा ग्राहकांना कोणताही फटका बसणार नसल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. (These banks will be hit by the new rules of RBI, know which banks)

या बँकांना बसणार आरबीआयच्या नवीन नियमांचा फटका, जाणून घ्या कोणत्या बँका?
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 10:01 PM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी बँकांतील एमडी आणि सीईओ यांसारखया प्रमुख पदांवरील नियुक्तीसंदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार खासगी बँकांच्या एमडी, सीईओ या प्रमुख पदांवर कोणतीही व्यक्ती 15 वर्षांपेक्षा अधिक काळ राहू शकणार नाही. बँकेतील शेअर होल्डर आणि प्रमोटरसाठी जास्तीत जास्त 12 वर्षांचा कार्यकाळ असेल. पुढे रिझर्व्ह बँक संबंधित पदावरील व्यक्तीला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देऊ शकणार आहे. त्याचबरोबर या प्रमुख पदांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे असणार आहे. म्हणजेच 70 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीची नियुक्ती केली जाणार नाही. नवीन नियमानुसार, कोणतीही व्यक्ती 75 वर्षे वयानंतर नॉन-एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत राहू शकणार नाही. यात बँकेच्या चेअरमनचाही समावेश आहे. सरकारी आणि परदेशी बँकांना हा नियम लागू नसेल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. नव्या नियमांची 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. आरबीआयच्या नव्या नियमांचा ग्राहकांना कोणताही फटका बसणार नसल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. (These banks will be hit by the new rules of RBI, know which banks)

कोटक महिंद्रा बँकेला झळ; उदय कोटक यांची फेरनियुक्ती होऊ शकणार नाही

आरबीआयच्या नव्या नियमाचा पहिला हादरा ‘कोटक महिंद्रा’ बँकेला बसणार आहे. या बँकेच्या संस्थापक-सीईओपदी उदय कोटक यांना पुढील दोन वर्षांत आपली खुर्ची सोडावी लागणार आहेत. ते बँकेच्या सीईओ पदावर मागील तब्बल 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. नव्या नियमामुळे त्यांची आता फेरनियुक्ती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उदय कोटक हे डिसेंबर 2023 नंतर बँकेच्या चेअरमनपदासाठी अपात्र ठरतील. तसेच दिपक गुप्ता यांनाही 2023 नंतर वरिष्ठ पदापासून दूर व्हावे लागणार आहे.

दोघांनी बँकेच्या विकासासाठी तसेच एकूण वाटचालीत भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे हे दोघे प्रमुख पदांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यास कोटक महिंद्रा बँकेच्या पुढील वाटचालीवर लक्षणीय परिणाम होऊ शकेल, असे ‘नोमुरा’ या वित्तीय संस्थेने म्हटले आहे. दिपक गुप्ता यांच्याकडे कारकिर्द संपल्यानंतर सेवानिवृत्तीचाच पर्याय असणार आहे. नव्या नियमाचा कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सवर विशेष परिणाम दिसून येईल, असा अंदाज अमेरिकन ब्रोकरेज हाऊस जे. पी. मॉर्गनने व्यक्त केला आहे. बँकेचे बाजार भांडवल 3.45 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

आरबीएल, बंधन व इतर बँकांनाही फटका बसणार

आरबीआयच्या नव्या नियमाचा खासगी क्षेत्रात चांगला जम बसवलेल्या आरबीएल, बंधन तसेच इतर बँकांनाही कमी-अधिक प्रमाणात फटका बसणार आहे. बंधन बँकेचे संस्थापक-मालक चंद्रशेखर घोष यांना 8 वर्षांनी बँकेच्या प्रमुखपदाची खुर्ची सोडावी लागणार आहे. घोष यांनी शून्यातून विश्व उभारले आहे. एकेकाळी ते दूध विकून स्वत:चे घर चालवायचे. सध्या ते 50 हजार कोटींच्या बंधन बँकेचे मालक आहेत. त्यांनी 2009 मध्ये बंधन बँकेची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून रिझर्व्ह बँकेकडे नोंदणी केली होती. त्यांनी जवळपास 80 लाख महिलांचे जीवन बदलून टाकले. (These banks will be hit by the new rules of RBI, know which banks)

इतर बातम्या

वयाच्या 17व्या वर्षापासून गीतलेखन, दहा हजारांवर गाणी लिहिली; वाचा, कोण होते हरेंद्र जाधव?

LIC Aadhaar Shila: महिलांसाठी सर्वोत्कृष्ट पॉलिसी, दररोज 29 रुपये बचत करून लाखो कमवा

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.