Gold Reserve : या देशांकडे आहे सोन्याचे भंडार! भारताचा क्रमांक कितवा

Gold Reserve : जगात सोन्याचे खूप साठे आहेत. सोन्याच्या खाणी आहेत. पण सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडे आहे माहिती आहे का? या यादीत भारताचा क्रमांक कितवा ते जाणून घ्या.

Gold Reserve : या देशांकडे आहे सोन्याचे भंडार! भारताचा क्रमांक कितवा
हा देश सोन्याचे भंडार
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 7:52 PM

नवी दिल्ली : जगात अनेक देशांमध्ये सोन्याच्या खाणी, साठे आहेत. अनेक देशांकडे सोन्याचा खूप मोठा साठा (Gold Reserve) आहे. सोने आजही सुरक्षित गुंतवणूक मानण्यात येते. त्यामुळे अनेक देश सोन्यात मोठी गुंतवणूक करतात. सोन्यातील गुंतवणूक अत्यंत फायदेशीर असल्याने अनेक देश सोन्याची आयात (Gold Import) करतात. सोन्याची आयात करण्यात चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतीयांचे सुवर्णवेड जगप्रसिद्ध आहे. सोन्याचे भाव (Gold Price) कडाडले असले तरी सराफा बाजारातील गर्दी कमी होण्याचे नाव नाही. पण सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडे आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? या यादीत भारताचा क्रमांक कितवा ते जाणून घ्या.

अमेरिकाकडे सर्वात मोठा साठा सोन्याचा सर्वाधिक साठा अमेरिकेकडे आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलने (WGC) जगातील टॉप-10 देशांकडे सर्वाधिक सोन्याचा साठा असल्याचा दावा केला आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक सोने अमेरिकेकडे आहे. या यादीत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिकेकडे 8,133.46 मेट्रिक टन सोने आहे. या यादीत जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनीकडे 3,355.14 मेट्रिक टन सोने आहे. अमेरिकेच्या तुलनेत हे प्रमाण अर्ध्यांहून कमी आहे.

जर्मनी, फ्रांस पण आघाडीवर इटलीकडे जर्मनीपेक्षा कमी म्हणजे 2,451.84 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. इटलीची राष्ट्रीय बँक Banca d’Italia ने 1893 साली सोने खरेदी सुरु केल होती. त्यानंतर फ्रांसचा क्रमांक लागतो. या देशाकडे 2,436.75 मेट्रिक टन गोल्ड रिझर्व्ह आहे. या देशाच्या राष्ट्रीय बँकेत सोने तळघरात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

रशिया आणि चीन स्पर्धेत फ्रांसनंतर रशियाचा क्रमांक लागतो. रशियाच्या केंद्रीय बँकेकडे 2,301.64 मेट्रिक टन सोने आहे. चीनची केंद्रीय बँक पीपल्स बँक ऑफ चायना (PBoC) बीजिंगमध्ये आहे. या बँकेकडे 2,010.51 मेट्रिक टन सोने आहे. 2000 साली या बँकेने सर्वाधिक सोने खरेदी केली.

भारताचा क्रमांक कितवा स्वीडनची राष्ट्रीय बँक या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. या बँकेकडे 1,040 मेट्रिक टन सोने आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही देशाकडे 1000 मेट्रिक टन सोने नाही. जपानकडे 845.97 मेट्रिक टन सोने आहे. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षांत सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. 2017 पासून सोन्याच्या साठ्यात जोरदार वाढ झाली आहे. भारताच्या केंद्रीय बँकेकडे 787.40 मेट्रिक टन सोने आहे.  सोने खरेदीत भारताने अशात अजून आघाडी घेतली आहे.  या यादीत 10 व्या स्थानी नेदरलँड आहे. नेंदरलँडच्या डच नॅशनल बँकेकडे 612.45 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.