हे Mutual Fund आहेत ‘हलाल’; रिटर्न देण्यात एकदम अव्वल, नाव आहेत का माहिती?

Ethical Mutual Funds : मुस्लिम समुदाय दारू, सिगरेट अथवा अशा वस्तू ज्या निषिद्ध मानल्या जातात, त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये पैसा गुंतवत नाही. हे त्यांच्या नियमांविरुद्ध असल्याचे मानलं जातं. त्यामुळे काही कंपन्यांनी मुस्लिम समाजातील गुंतवणूकदारांसाठी हलाल फंड सादर केले आहेत. कोणते आहेत हे शेअर, काय आहे त्यांचे नाव, जाणून घ्या एका क्लिकवर

हे Mutual Fund आहेत 'हलाल'; रिटर्न देण्यात एकदम अव्वल, नाव आहेत का माहिती?
हलाल म्युच्युअल फंड
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 4:23 PM

सुरक्षित भविष्यासाठी देशातील अनेक लोक बँकेतील मुदत ठेव, पोस्ट कार्यालयातील योजना, शेअर बाजारा वा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. त्याबदल्यात त्यांना चांगला परतावा मिळतो. पण गुंतवणुकीचा हा पर्याय सर्वच जण आजमावतात असे नाही. मुस्लीम समाजातील अनेक जण काही कंपन्यांमध्ये आणि काही प्रकारच्या गुंतवणुकीत पैसा जमा करणे अयोग्य मानतात. मुस्लिम समुदाय दारू, सिगरेट अथवा अशा वस्तू ज्या निषिद्ध मानल्या जातात, त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये पैसा गुंतवत नाही. हे त्यांच्या नियमांविरुद्ध असल्याचे मानलं जातं. त्यामुळे काही कंपन्यांनी मुस्लिम समाजातील गुंतवणूकदारांसाठी हलाल फंड सादर केले आहेत.

काय आहे हलाल म्युच्युअल फंड?

इस्लामिक कायद्यानुसार, काही कंपन्यांनी काही खास म्युच्युअल फंड बाजारात आणले आहे. त्यांना शरिया कॉम्लिएंट म्युच्युअल फंड अथवा हलाल म्युच्युअल फंड असे म्हटले जाते. शरियातील कायद्याच्या चौकटीत हे म्युच्युअल फंड काम करतात, असा दावा करण्यात येतो. पोर्टफोलिओ तयार करताना हे म्युच्युअल फंड त्या कंपन्यांमध्ये बिलकूल गुंतवणूक करत नाहीत, ज्यांचा व्यवहार आणि व्यवसाय हा निषिद्ध मानल्या जातो.

हे सुद्धा वाचा

काय आहे या फंडाच्या अटी-शर्ती?

बाजारात प्रचलित गुंतवणूक आणि बचत योजनांमध्ये इस्लामच्या काही धार्मिक मान्यता आडव्या येतात. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्याची या हलाल म्युच्युअल फंडात विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू आहेत. व्याज न कमावणाऱ्या कंपन्या शोधून काढणे हे जिकरीचे काम आहे. त्यामुळे हलाल म्युच्युअल फंडात अशा कंपन्यांचा समावेश करण्यात येतो, ज्यांची कमाईतील व्याजाचा वाटा हा जास्तीत जास्त 3 टक्के असेल. तर एकूण संपत्तीच्या 25 टक्क्यांपेक्षा कर्ज कमी असेल अशाच कंपन्या या फंडसाठी निवडल्या जातात.

परतावा देण्यात हलाल फंड अव्वल

म्युच्युअल फंड हे एफडीपेक्षा चांगला परतावा देतात, असे मानले जाते. हलाल फंड सुद्धा कमाई करून देण्यात मागे नाहीत. टाटा एथिकल फंडने (Tata Ethical Fund) एका वर्षात 32.51% परतावा दिला आहे. तर तीन वर्षात या फंडने 17.25% आणि पाच वर्षांत 22.85% रिटर्न दिला आहे. टॉरस एथिकल फंडने (Taurus Ethical Fund) एका वर्षात 42.40%, तीन वर्षांत 18.31% आणि पाच वर्षांत 22.51% रिटर्न दिला आहे. याशिवाय निप्पॉन इंडिया ईटीएफ शरिया बीईईएस या हलाल फंडने (Nippon India ETF Sharia BeES) एका वर्षात 31.69%, तीन वर्षांत 10.93% आणि पाच वर्षांत 18.02% परतावा दिला आहे. हलाल म्युच्युअल फंडात रिलायन्स ईटीएफ शरिया बीईईएसने (Reliance ETF Shariah BeES) एका वर्षात 31.69%, तीन वर्षांत 10.93% आणि पाच वर्षांत 18.02% परतावा दिला आहे.

विशेष सूचना : हा Mutual Fund चा केवळ लेखाजोखा आहे.  गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.