व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आहेत हे चार आधारस्तंभ, जाणून घ्या!
एका ठराविक वेळेत इतकी उलाढाल झालीच पाहिजे, व्यवसाय मोठा करण्यासाठीची क्षमता, जास्त व्यवसाय देणाऱ्या क्लाएंट्ससाठी पिचिंग करणे आणि ते मिळवणे अशा अनेक निकषांचा त्यात समावेश होतो.

मुंबई : तुमचा स्वतःचा बिझनेस असूनही, कामाच्या ताणामुळे, तुमच्या मनात स्वतःच्याच बिझनेसमध्ये गुलाम असल्याची भावना घर करतेय का? तर थांबा आणि जाणून घ्या सोप्या पद्धतीने बिजनेस करण्याचा मार्ग- व्यवसाय हा तार्किक म्हणजेच तोलूनमापून केलेल्या कृतीचा आणि धोरणांचा खेळ समजला जातो. प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात शिखर गाठायचे असते. पण ते कसे गाठायचे हा प्रश्न त्याचासमोर असतो. याबाबत श्रद्धा सुब्रमणिअन, इंट्युशन एक्स्पर्ट, संस्थापक आणि सीईओ यांनी सांगितलं आहे.
अनेकांना वाटते की, जितके जास्त काम होईल, तेवढी व्यावसायिक प्रगती जास्त होईल. पण असे करताना ती व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जाते. या थकव्यामुळे एकाच ठिकाणी अडकून राहिल्याची भावना निर्माण होते. कारण परिणाम साध्य करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काम करणे हा एकच पर्याय असतो आणि एक व्यक्ती किती काम करू शकते याला एक निश्चित मर्यादा असते. हे काम केल्यानंतर फावला वेळच उरत नाही आणि व्यवसाय संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकतो. सगळी ऊर्जा व्यवसायातच खर्च होते आणि सगळे लक्ष व्यवसायाकडेच द्यावे लागते.
स्वतःचा ‘बॉस’ असल्याची कल्पना विरून जाते आणि असे व्यावसायिक आपल्याच व्यवसायाचे गुलाम होतात. आपल्या ग्राहकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अनेकांना दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे ७ दिवस सजग राहावे लागते आणि या सर्व बाजूंनी विचार करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे अशा प्रकारे सजग न राहिल्यास FOMO अर्थात फिअर ऑफ मिसिंग आउट (इतरांच्या तुलनेने मागे राहणे) ही भावना निर्माण होते.
व्यावसायिकांसाठी आणि विस्तारीकरण करण्याची क्षमता असलेल्या व्यवसायांसाठी अनेक आव्हाने असतात. व्यावसायिक भरभराटीऐवजी सगळे कष्ट फक्त व्यवसाय टिकवून कसा ठेवता येईल यावर केंद्रित केले जाते. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही कायम उपलब्ध असले पाहिजे ही अपेक्षा तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेते. तसेच व्यवसाय मालकाला कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असले तरी एका ठराविक वेळेमध्ये काय साध्य करण्याची कल्पना
केली होती आणि प्रत्यक्षात काय साध्य करता आले, यात अनेकदा तफावत आढळते. या सगळ्या आव्हानांमुळे काही जण या चक्रातून बाहेर पडतात आणि नोकरी हा पर्याय पून्हा निवडतात. व्यवसाय करताना अनेक निकष लावले जातात. व्यवसायातून किती उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
एका ठराविक वेळेत इतकी उलाढाल झालीच पाहिजे, व्यवसाय मोठा करण्यासाठीची क्षमता, जास्त व्यवसाय देणाऱ्या क्लाएंट्ससाठी पिचिंग करणे आणि ते मिळवणे अशा अनेक निकषांचा त्यात समावेश होतो. पण हेच निकष व्यवसायाच्या यशाच्या मार्गात अडथळे होऊन राहतात. असे असताना शारीरिक, मानसिक, भावनिक थकवा न येता यश मिळवणे खरेच शक्य आहे का, आणि असेल तर ते कसे साध्य करावे ते जाणून घेऊयात. अगदी सहजपणे यश साध्य करण्यासाठी ‘जॅकपॉट पद्धत’ हा सोपा मार्ग उपलब्ध आहे. व्यवसायात उत्तमप्रगती करण्यासाठी जॅकपॉट पद्धतीमध्ये चार स्तंभ आहेत, ते खालीलप्रमाणे-
1. जॅकपॉट नंबर – हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी निश्चित केलेला उत्पन्नाचा सध्या न करता येण्यासारखा आकडा असतो. बहुतेक व्यावसायिक आपल्या मासिक वा वार्षिक उत्पन्नाबद्दल समाधानी असतात त्यामुळे या उत्पन्नापेक्षा जास्तही आपल्याला मिळवता येऊ शकतं, या बाबतीत विचारच केला जात नाही. ते लक्ष्य भूतकाळातील अनुभव व कामगिरी यावर आधारित असते. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी असा आकडा सेट करू शकता, पण सध्याच्या घडीला तुम्हाला वाटते ही हे लक्ष्य केवळ साध्य न करण्यासारखेच आहे. असे लक्ष्य निश्चित करण्याचा सोपा उपाय म्हणजे तुमचे जे काही वार्षिक लक्ष्य आहे त्या आकड्यामध्ये एक किंवा दोन शून्ये वाढविणे. म्हणजे ते लक्ष्य दसपट किंवा शतपट करणे. आणि हा आकडा तुमच्यासाठी असाध्य आहे, असे तुम्हाला वाटले पाहिजे.
2. जॅकपॉट अलाइनमेंट – याचे २ भाग आहेत ते खालीलप्रमाणे:
जॅकपॉट ब्लॉक निश्चित करणे – तुम्ही एकदा जॅकपॉट नंबर निश्चित केला, ते ध्येय साध्य कसे करायचे याबद्दल साहजिकच एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. तुम्हाला वाटत असते की हे लक्ष्य गाठणे सोपे नाही, किंबहुना ते प्रचंड कठीण आहे. पुढची पायरी ही की, हे लक्ष्य गाठणे सध्याच्या घडीला तुम्हाला का शक्य नाही, याची सगळी कारणे लिहून काढणे. एकदा तुम्ही ही कारणे लिहून काढली की, तुम्हाला वाटत असलेले अडथळे हे वास्तवातील अडथळे आहेत की, केवळ तुमच्या मनात असलेले अडथळे आहेत, या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले पाहिजे.
उदा. व्यवसाय वाढविण्यासाठी स्रोत निर्माण करण्यात येणारा अडथळा हे कारण असेल तर मला हे स्रोत तयार करता येतील की नाही, हा एक गृहित धरलेला अडथळा असू शकतो. कारण मला असे स्रोत निर्माण करता येणार नाहीत असे तुम्ही म्हणत असाल तर स्रोतनिर्मिती करण्याचे मार्ग असू शकतात. हे अडथळे म्हणजे तुमच्या धारणा असतात, ज्या पैशाबद्दल किंवा मोठे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या असलेल्या क्षमतांबद्दल तुम्हीच निर्माण केलेल्या असतात.
परिस्थितीशी संलग्न असणे – एकदा का तुम्हाला हे अडथळे समजले की, पुढची पायरी म्हणजे तुम्ही निश्चित केलेला आकडा स्वीकारणे. हा जो काही आकडा आहे तो तुम्हाला पटलेला आहे किंवा तुमच्या मनाला मान्य आहे हे निश्चित करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तो जॅकपॉटचा आकडा बाहेरच्या जगात साध्य होण्यासाठी, तो आधी तुमच्या आंतरिक जगात म्हणजे मनाला पटला पाहिजे. जॅकपॉट ब्लॉकचे वर्गीकरण केल्याने तुम्ही निश्चित केलेला आकडा स्वीकारणे तुम्हाला सोपे जाईल. म्हणजे मी तो आकडा किंवा ते लक्ष्य साध्य करू शकतो हा विश्वास वाटू लागणे. तुम्ही लक्ष्य साध्य करू शकता असे तुम्हाला वाटणे म्हणजे ते लक्ष्य साध्य करण्याची क्षमता असल्याचा विश्वास असल्याची भावना पक्की होते. ते लक्ष्य प्रत्यक्ष साध्य करणे हा नंतरचा भाग आहे. कारण सध्या तुम्ही ते लक्ष्य साध्य करण्यासाठी एकही पाऊल उचललेले नाही. फक्त ते लक्ष्य साध्य करणे किंवा तो आकडा गाठणे शक्य आहे, हे तुम्हाला वाटू लागते.
3. जॅकपॉट मॅग्नेट – हा स्तंभ म्हणजे प्रीमिअम क्लायंटसोबत काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा तुमच्यात असणे, एखाद्या प्रीमिअम डीलच्या मागे धावण्यापेक्षा त्या डीलला म्हणजेच व्यवहाराला स्वतःकडे आकर्षित करणे, क्लायंट्स त्यांचे काम करून घेण्यासाठी स्वतःहून तुमच्याकडे येणे आणि तुमचे एकूणच काम, क्षमता, व्यवसायात तुमच्यातील ऊर्जा अत्यंत महत्त्वपूर्ण असते. या आधीही तुम्ही अनेक डील्स प्राप्त केल्या असतील आणि त्या अनुभवांचे तुम्ही विश्लेषण केल्यास, ही डील माझीच आहे हा विश्वास तुम्हाला वाटण्यासाठी काय कारणीभूत होते हे तुम्हाला समजू शकेल.
तुमच्यातील ऊर्जा तुमच्या संभाषणांमधून दिसत होती आणि समोरची व्यक्ती तुमच्याशी व्यवहार करण्यास उत्सुक झाली होती. विचार करा, एखादी व्यक्ती तुमच्याशी संभाषण करताना उदासीन असेल तर तुम्हाला त्यांच्यासोबत व्यवसाय वा व्यवहार करायला आवडेल का? जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतांबद्दल अनिश्चित असता, तुमचा स्वतःच्या पूर्वतयारीवरविश्वास नसतो किंवा तुमच्या व्यवसायातील तुमच्या स्थानाविषयी तुम्हाला खात्री नसते, तेव्हा नेमके हेच घडते. फक्त मार्केटमधील किमतीशी जुळवून घेण्यासाठी तुम्ही डिस्काउंट देत असाल किंवा तुमच्या योग्यतेनुसार शुल्क आकारत नसाल तर हे हवालदिल होऊन व्यवसाय करण्याचे एक उदाहरण ठरते.
लोक तुमच्याकडे येतात आणि तुम्ही डील प्राप्त करता, ही आदर्श परिस्थिती असते. यासाठी तुम्हाला दिवसातील किती तास तुम्ही सक्रियपाने काम करू शकता, याचा शोध घ्यावा लागेल. दिवसातील कोणत्या वेळेत तुम्ही खूप उत्साहात असता हे तुम्हाला माहीत असते. त्याच वेळांमध्ये तुम्ही तुमची सर्वात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे दिवसाच्या कोणत्या वेळी तुमच्यातील उत्साह मध्यम स्वरुपाचा असतो किंवा कमी झालेला असतो हे तुम्हाला समजले तर त्या वेळी तुम्ही कशा प्रकारे संवाद साधता हेही तुम्हाला कळू शकेल. त्यात बदल करून ती वेळही तुमच्यासाठी लाभदायी कशा प्रकारे करता येईल, हे तुम्ही निश्चित करू शकाल. तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या अटी व शर्तींवर बिझनेस प्राप्त करू शकाल.
4. जॅकपॉट ऱ्हिदम – तुम्ही जॅकपॉट आकडा साध्य करू शकता हे तुम्हाला पटलेले असते आणि त्या पातळीच्या क्लाएंट्सना आकर्षित करण्याची योग्य ऊर्जा तुमच्यात असेल तर तुमच्या प्रीमिअम क्लाएंटला कॉल करताना तुम्ही अवघडून जाल का? मुळीच नाही. तुम्ही कायम एकेक पाऊल पुढे टाकाल. तुमची कृती कायम प्रेरित असेल आणि उत्तम परिणाम साध्य करण्याचा उत्साह तुमच्यात असेल. तुम्ही खूप काही साध्य करू शकता आणि उत्तम लय साध्य झाली तर तुम्ही या चारही स्तंभांची लय एकत्रित साकारू शकता. परिणामी, तुम्ही नवीन जॅकपॉट नंबर निश्चित करता, अडथळे ओळखता आणि ते लक्ष्य साध्य करण्यासाठी हवे ते सर्व प्रयत्न तुम्ही करता.
बिझनेस हा केवळ तर्क आणि धोरणांचा खेळ नाही. तुम्ही प्रत्यक्ष काम केल्याशिवाय धोरणांचा काही उपयोग होत नाही. तुम्ही तुमच्या लक्ष्याशी एकरूप होता, अनुकूल होता, स्वीकारता तेव्हा ते साध्य करणे तुम्हाला अधिक सोपे होते. एक उद्योजक म्हणून तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुम्ही जगत असता, आयुष्याच्या सर्वच पैलूंमध्ये यशस्वी असता आणि व्यवसायही स्वयंचलितपणे समृद्ध होतो आणि विस्तारतो. हे आश्चर्य घडवून आणणारे स्तंभ तुमच्या व्यवसायात लागू करण्यासाठी तुम्ही तयार आहात का!