चाचणीत सपशेल नापास ठरल्या या औषधी कंपन्या; राजकीय पक्षांनी किती दिल्या देणग्या? आकडे तर बोलतात

Donation to Political Party : गुणवत्ता चाचणीत सपशेल फेल ठरलेल्या औषधी कंपन्यांनी राजकीय पक्षांना मोठ्या देणग्या दिल्याचे उघड झाले आहे. नुकत्याच झालेल्या चाचणीत या कंपन्यांची औषधं मानांकनावर टिकली नाहीत. या कंपन्यांनी कोणत्या पक्षाला किती देणगी दिली हे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

चाचणीत सपशेल नापास ठरल्या या औषधी कंपन्या; राजकीय पक्षांनी किती दिल्या देणग्या? आकडे तर बोलतात
कंपन्यांनी किती दिले डोनेशन
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 5:59 PM

अनेक नामांकित औषधी कंपन्यांनी भेसळयुक्त औषधं बाजारात आणल्याचे समोर आले. एका तपासणी अहवालात आपल्या देशातील 53 औषधांमध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. गुणवत्तेत ही औषधं सपशेल फेल ठरल्याचे समोर आले आहे. या औषधांमध्ये Paracetamol, Pan-D आणि Telma-H या सारख्या औषधांचा समावेश आहे. ही औषधं ताप, अपचन आणि उच्च रक्तदाबासाठी वापरण्यात येत होती. या ताज्या अहवालामुळे देशभरातील रुग्णांना मोठा धक्का बसला. औषधी निर्मिती क्षेत्रातील या नामांकित कंपन्या आहेत. विशेष म्हणजे या कंपन्यांनी मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांना निवडणूक रोख्याच्या स्वरुपात कोट्यवधींचा निधी दिल्याचे समोर आले आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या झोळीत या पक्षांनी किती देणगी दिली हे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

निवडणूक रोख्याच्या माध्यमातून पैसा

यामध्ये सर्वात मोठी फार्मा कंपनी Torrent Pharmaceuticals ची दोन औषधं गुणवत्ता चाचणीत भेसळयुक्त निघाली. Shelcal आणि Montair LC ही कंपनीची दोन औषधं या गुणवत्ता चाचणीत खरी उतरली नाहीत. या फार्मा कंपनीने 77 कोटी 50 लाख रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. यामध्ये 61 लाख रुपये भाजपच्या झोळीत तर 5 कोटींचे निवडणूक रोखे काँग्रेस पक्ष आणि 3 कोटी रुपये समाजवादी पक्ष तर एक कोटी रुपयांचे रोखे आम आदमी पक्षाच्या खात्यात गेले.

हे सुद्धा वाचा

दुसरी फार्मा कंपनी ALKEM ही Health Science आणि PAN-D ही औषधं तयार करते. या कंपनीने भाजपाच्या खात्यात 15 कोटी रुपये निवडणूक बाँडच्या स्वरुपात जमा केले. तिसरी फार्मा कंपनीच्या औषधात भेसळ आढळली, त्या कंपनीचे नाव हेटरो लॅब लिमिटेड असे आहे. या कंपनीने 25 कोटी रुपयांचे निवडणूक बाँड खरेदी केले आहेत. यामधील 20 कोटींचे निवडणूक रोखे के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगाणा राष्ट्र समितीला तर 5 कोटी रुपये भाजपला या रोख्यांच्या माध्यमातून दिले आहे. SUN फार्मा या नावाजलेल्या कंपनीचे बाजारातील औषधं गुणवत्तेवर टिकली नाहीत. या कंपनीने निवडणूक रोख्यातून 31 कोटी रुपये भाजपच्या झोळीत टाकले.

कंपन्यांचे म्हणणे तरी काय?

ज्या कंपन्यांच्या औषधांमध्ये भेसळ आढळली. त्या कंपन्यांनी अनेक राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यात कोट्यवधी रुपये दिले आहेत. या देणग्या कशासाठी दिल्या ते समोर आले नाही. पण या कंपन्यांनी देणगी रुपयात कोट्यवधी रुपये दिले आहेत. सन फार्मा आणि टॉरेंट या कंपन्यांनी भेसळयुक्त औषधं त्यांची नसून ती औषधं नकली असल्याचा दावा केला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.