Hero : घरबसल्या झाली बम्पर कमाई! हेच गुंतवणूकदार ठरले ‘Hero’

Hero : या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना घरबसल्या बम्पर कमाई करता आली. दुचाकी उत्पादनातील अग्रेसर कंपनी हिरो मोटोकॉर्पमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. त्यांना प्रत्येक शेअरमागे एवढी जबरदस्त कमाई करता आली..

Hero : घरबसल्या झाली बम्पर कमाई! हेच गुंतवणूकदार ठरले 'Hero'
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 10:57 AM

नवी दिल्ली : देशात सर्वाधिक विक्री होणारी मोटारसायकल Hero Splendor चे उत्पादन करणाऱ्या Hero MotoCorp मुळे गुंतवणूकदारांचा बक्कळ कमाई करता आली. त्यांना लॉटरीच लागली. हिरो मोटोकॉर्प कंपनीने जानेवारी ते मार्च या तिमाहीत जबरदस्त विक्री केली. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 37 टक्के वाढ झाली. कंपनीने हा नफा, गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा वाटला. हिरो मोटोकॉर्पच्या कमाईत यंदा 12 टक्क्यांची भर पडली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत मिळविलेल्या नफ्यापेक्षा यंदा विक्रीतून जादा कमाई करता आली. त्यामुळे गुंतणूकदार मालामाल झाले. हे गुंतवणूकदारच खरे ‘हिरो’ ठरले.

असा झाला फायदा हिरो मोटोकॉर्पला गेल्या वर्षीपेक्षा यंदा 37 टक्क्यांची वाढ दिसून आली. Hero MotoCorp ने हा आनंद लागलीच वाटला. त्यांनी शेअर होल्डर्सला फायदा मिळवून दिला. कंपनीने प्रत्यके शेअरमागे बम्पर परतावा दिला. गुंतवणूकदारांना घरबसल्या एका शेअरमागे 100 रुपयांची कमाई करता आली. त्यामुळे ज्याच्याकडे जास्त शेअर होते, त्याला तर एकदम लॉटरी लागली.

निव्वळ नफा इतका हिरो मोटोकॉर्पला आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत 859 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. कंपनीच्या या उलाढालीतून 12 टक्के फायदा झाला. ही कमाई 8,307 कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिमाहीत कमाई 8,238 कोटी रुपये होती.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक स्टॉकवर 100 रुपयांची कमाई कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. तसेच शेअरधारकांना लाभांश पण जाहीर केला. कंपनीने प्रत्यके शेअरवर 35 रुपये का अंतिम लाभांश देण्याची घोषणा केली. पूर्ण आर्थिक वर्षात या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर 100 रुपयांचा लाभांश मिळाला आहे. एकाच वर्षांत गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

काय असतो लाभांश कोणत्या ही कंपनीला जेव्हा जोरदार नफा होतो. फायदा होतो, तेव्हा त्यातील काही हिस्सा, वाटा कंपनी तिच्या शेअर होल्डर्समध्ये वाटप करते. त्यालाच इंग्रजीत डिव्हिडंड आणि मराठीत लाभांश असे म्हणतात. लाभातील, कमाईतील काही भाग दिल्या जातो.

स्प्लेंडरची विक्री जोरदार हिरो मोटोकॉर्प कंपनीची स्प्लेंडरही सर्वात स्वस्त मोटरसायकल आहे. तसेच ही सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. 2023 च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात सेल्स चार्ट मध्ये हे मॉडेल टॉपवर होते. जानेवारीत स्प्लेंडरचे 2,61,833 युनिट, फेब्रुवारीत 2,88,605 युनिट आणि मार्च मध्ये 3,17,103 युनिट विक्री झाली. स्प्लेंडरची 8.67 लाख युनिटपेक्षा अधिकची विक्री झाली. कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेईकलची विक्री वाढविण्याचे जाहीर केले आहे. नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पण कंपनी लवकरच बाजारात उतरविणार आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.