GDP | भारतच नाही तर जगातील हे छोटे देश पण सूसाट! या अर्थव्यवस्थांनी केली कमाल
GDP | बड्या अर्थव्यवस्थांना भारतीय अर्थव्यवस्थेने अगोदरच नाकेनऊ आणले आहे. तर काही वर्षांपासून दादागिरी करणाऱ्या चीनला पण भारतीय अर्थव्यवस्थेने घामाटा फोडला आहे. भारताची जीडीपी ग्रोथ यावर्षी सर्वात जास्त राहण्याचा अंदाज आहे. पण या छोट्या देशांनी पण महासत्तांना वाकुल्या दाखवल्या आहेत.
नवी दिल्ली | 11 February 2024 : जगातील बड्या अर्थव्यवस्थांना गेल्या वर्षांपासून आपल्या अर्थव्यवस्थेने घाम फोडला आहे. 10 व्या क्रमांकावरुन देशाने थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर आणखी चार वर्षांत देश तिसऱ्या स्थानी असेल. या आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा सर्वाधिक वेगाने धावणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर या छोट्या राष्ट्रांनी जगातील सर्वच महासत्तांच्या तोंडाला फेस आणला आहे. त्यांच्या अर्थव्यवस्था एकदम जोमात आहेत.
मकाऊ एकदम डौलात
हे इटुकले-पिटुकले देश भारताला पण जीडीपी वाढीत मागे टाकत आहेत. यामध्ये इवलासा मकाऊ आणि आफ्रिकेतील नायजेरीया हा देश आहे. मकाऊची जीडीपी वाढ 27.2% राहिल. तर नायजेरियाची अर्थव्यवस्था 11.1% तेजीत असेल. भारतीय जीडीपी यंदा 6.3 टक्के वेगाने धावण्याचा अंदाज आहे. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये हा वेग सर्वात जास्त आहे.
हे देश पण नाहीत मागे
- भारतीय अर्थव्यवस्थेने सध्या चारचांद लावले आहेत. आपल्यानंतर इथिओपिया हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. या आफ्रिकन देशाची जीडीपी वाढ 6.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
- आपला शेजारी बांगलादेश 6.0 टक्क्यांसह यादीत पाचव्या क्रमांक आहे. तर त्यानंतर व्हिएतनाम 5.8 टक्के, इंडोनेशिया 5.0 टक्के, व्हेनेझुएला 4.5 टक्के, चीन 4.2 टक्के, आयरलँड 3.3 टक्के जीडीपी
- युक्रेन 3.2 टक्के, नायजिरिया 3.1 टक्के, इस्त्राईल 3 टक्के, तुर्की 3.0 टक्के, अर्जेंटिना 2.8 टक्के आणि इराण 2.5 टक्के असा क्रमांक आहे. तर पाकिस्तानची जीडीपी ग्रोथ रेट यंदा 2.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
सर्वात कमी वाढ
- इंग्लंडची अर्थव्यवस्था यंदा 0.6 टक्क्यांच्या वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. स्वीडनच्या अर्थव्यवस्थेचा वेग इतकाच राहिल. इटलीची अर्थव्यवस्था 0.7% राहण्याचा अंदाज आहे. तर ऑस्ट्रिया या देशाचा जीडीपीचा वेग 0.8 टक्के राहिल.
- युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीची अर्थव्यवस्था यंदा 0.9 टक्के दराने वाढणार आहे. जपान, फिनलँड, रशिया, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, डेन्मार्क, अमेरिका, नॉर्वे, ब्राझिल, कॅनाडा, स्पेन, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका या देशांचा जीडीपी ग्रोथ एक ते दोन टक्क्यांदरम्यान असेल. इतर काही देश तर यापेक्षा पण कमी कामगिरी बजावण्याची भीती आहे.