कमाईत मुकेश अंबानी यांना या उद्योजिकेने टाकले मागे, या कुटुंबाची आहे प्रमुख
Mukesh Ambani | देशात सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो. तर देशातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये जिंदल कुटुंबाची प्रमुख सावित्री जिंदल यांचा क्रमांक लागतो. त्यांनी नुकताच एक विक्रम केला आहे. त्यांनी कमाईत मुकेश अंबानी यांना पण मागे टाकले आहे.
नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज अग्रेसर आहे. या कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे आहेत. तर सर्वात श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदल यांचा क्रमांक लागतो. त्यांनी एक विक्रम नावावर नोंदवला आहे. त्यांनी कमाईत मुकेश अंबानी यांना मागे टाकले. ओपी जिंदल समूहाच्या चेअरपर्सन सावित्री जिंदल यांच्या एकूण संपत्तीत 9.6 अब्ज डॉलरची भर पडली आहे. त्यामुळे भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्या पाचव्या क्रमांकावर पोहचल्या आहेत. सावित्री जिंदल यांची नेटवर्थ आता 25.3 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या नेटवर्थमुळे त्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
असे टाकले अंबानी यांना मागे
ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची नेटवर्थमध्ये यावर्षात जवळपास 5 अब्ज डॉलरची भर पडली. त्यांचा एकूण कमाईचा आकडा 92.3 अब्ज डॉलरवर पोहचला. ते आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले. ओपी जिंदल समूहाच्या प्रमुख सावित्री जिंदल यांनी यावर्षात 9.6 अब्ज डॉलरची कमाई केली. कमाईत त्यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले.
नवीन कंपनी लवकरच बाजारात
सावित्री जिंदल यांच्या ओपी जिंदल समूहाच्या काही कंपन्या शेअर बाजारात आहेत. त्यात जेएसडब्ल्यू स्टील, जिंदल स्टील अँड पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, जिंदल साव, आणि जिंदल स्टेनलेस यांचा समावेश आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांनी पतीला गमावले. समूहाची सर्व जबाबदारी त्या लिलया संभाळत आहेत. पुढील वर्षी, जिंदल समूह जेएसडब्ल्यू सिमेंट ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे समूहाच्या विकासाला चालना मिळू शकते.
हे पण श्रीमंतांच्या यादीत
या वर्षी ब्लूमबर्ग बिलिनिअर निर्देशांकानुसार, एचसीएलचे शिव नाडर यांच्या एकूण संपत्तीत 8 अब्ज डॉलरची भर पडली. त्यामुळे त्यांची नेटवर्थ 32.6 अब्ज डॉलरवर पोहचली. त्यांचा या कंपनीत 61% वाटा आहे. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये 45% तेजी दिसून आली. डीएलएफचे केपी सिंह यांच्या एकूण संपत्तीत मोठी वृद्धी झाली. त्यांच्या एकूण संपत्तीत यंदा 7 अब्ज डॉलरची तेजी दिसली. आता त्यांचे नेटवर्थ 15.4 डॉलरवर पोहचले आहे. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये 83% तेजी दिसली. कुमार मंगलम बिर्ला आणि शापूर मिस्त्री यांच्या नेटवर्थमध्ये यंदा 6.3 अब्ज डॉलरची वाढ झाली. शेअर्समध्ये तेजी आली.