रिलायन्सची MSEB सोबत मोठी डील, या सोलर कंपनीसह तुमचे पण नशीब चमकवणार
Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या कंपनीविषयी ब्रोकरेज फर्म युबीएसने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरसाठी तेजीचे संकेत दिले आहे. या फर्मनुसार, हा शेअर लवकरच 3000 रुपयांहून 3400 रुपयांची उडी घेईल. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डासोबत तसा करार झाला आहे .
मुकेश अंबानी यांच्या समूहात अजून एका कंपनीची भर पडणार आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक कंपन्या आणि जागतिक ब्रँड रिलायन्समध्ये दाखल झाले आहे. तर काहींचा अर्ध्यांहून स्टेक, वाटा रिलायन्सने खरेदी केला आहे. यामुळे रिलायन्स समूहाचा पसारा वाढला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड इलेक्ट्रिसिटी बोर्डाला (MESB) त्याचा फायदा होईल. एवढंच नाही तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पण लवकरच मोठी उसळी घेण्याचा अंदाज ब्रोकरेज फर्म युबीएसने व्यक्त केला आहे. जाणून घ्या आहे ही डील…
MESB च्या सोलर कंपनीत गुंतवणूक
- एमईएसबीच्या सोलर ॲग्रो पॉवर अंतर्गत MSKVY नाइनटीन्थ सोलर SPV आणि MSKVY टवेंटी-सेंकड सोलर SPV मध्ये रिलायन्स 100 टक्के वाटा खरेदी करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मंडळाने या अधिग्रहणाला मंजूरी दिली आहे.
- कंपनीने एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या अर्जानुसार, 128 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा स्थापन करण्यासाठी निविदेच्या अधिन राहून हा करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध साईटसाठी हा करार करण्यात आला आहे. MESB सोलर ॲग्रो पॉवरची अधिग्रहण प्रक्रिया एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अर्थात या करारामुळे रिलायन्सला अक्षय ऊर्जा क्षेत्रात नवीन भरारी घेता येईल. सध्या अदानी समूह आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलाकडे आलेल्या कंपन्या अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत.
ब्रोकरेज फर्मचा मोठा विश्वास
या घडामोडींमुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर कमाल करेल, अशी आशा ब्रोकरेज फर्म युबीएसने वर्तवली आहे. ब्रोकरनुसार, रिलायन्सचा शेअर 3000 रुपयांहून 3400 रुपयांपर्यंत भरारी घेईल. फर्मनुसार गुंतवणूकदार सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर खरेदी करु शकतात. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने पण रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी 3210 हे लक्ष्य ठेवले आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.